लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : एक महिन्याच्या प्रदीर्घ खंडानंतर विदर्भात पावसाला सुरुवात झाली आहे; परंतु पश्चिम विदर्भातील चार जिल्ह्यांत आणखी पावसाचा तुटवडा कायम आहे. अकोला जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरू पाचा पाऊस झाला, पण अद्याप ३२ टक्के पावसाची तूट कायम आहे. असे असले तरी हलका ते मध्यम पावसाने मूग, उडीद पिकांना संजीवनी मिळाली आहे.शुक्रवारपासून विदर्भात पावसाला सुरुवात झाली असली, तरी या पावसाचे सार्वत्रिक स्वरू प नसल्याने शेतकºयांची चिंता वाढली आहे. हा पाऊस तालुकानिहाय होत असल्याने पावसाची टक्केवारी वाढलेली दिसत आहे. असे असले, तरी या पावसाने माना टाकलेल्या पिकांना संजीवनी मिळाली आहे. पश्चिम विदर्भातील मूग, उडीद या अल्पकालीन पिकांना हा पाऊस प्रचंड पोषक ठरला आहे. ही दोन पिके ऐन सणासुदीच्या पूर्वी परिपक्क होत असल्याने शेतकºयांच्या हातात दिवाळी, दसºयाच्या अगोदर पैसा येतो. ही पिके काही ठिकाणी फुलोºयावर, शेंगावर आहेत. जूनच्या पहिल्या आठवड्यात ज्यांनी पेरणी केली, तेथे मुगाच्या शेंगा वाळल्या आहेत. काही ठिकाणा काढणीही सुरू झाली आहे; परंतु यावर्षी उशिरा पेरणी झाल्याने बहुतांश मूग, उडिदाचे पीक हिरवे आहे.
पश्चिम विदर्भात मध्यम स्वरूपाचा पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 8:36 PM
अकोला : एक महिन्याच्या प्रदीर्घ खंडानंतर विदर्भात पावसाला सुरुवात झाली आहे; परंतु पश्चिम विदर्भातील चार जिल्ह्यांत आणखी पावसाचा तुटवडा कायम आहे. अकोला जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरू पाचा पाऊस झाला, पण अद्याप ३२ टक्के पावसाची तूट कायम आहे. असे असले तरी हलका ते मध्यम पावसाने मूग, उडीद पिकांना संजीवनी मिळाली आहे.
ठळक मुद्देप्रदीर्घ खंडानंतर विदर्भात पावसाला सुरुवातअकोला जिल्हा दमदार पावसाच्या प्रतीक्षेत!