शहरं
Join us  
Trending Stories
1
बोपदेव घाट बलात्कार प्रकरण: पोलिसांनी आतापर्यंत किती आरोपींना अटक केलीये?
2
हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशाने शरद पवार गटात नाराजी? इंदापूरच्या कार्यकर्त्यांनी उमेदवार बदलण्याची केली मागणी
3
महायुतीचे जागावाटप ९०% पूर्ण! सर्वात आधी यादी कुणाची? भाजपा प्रदेशाध्यक्षांनी दिली महत्त्वाची अपडेट
4
सैनी सरकारचा १५ ऑक्टोबरला शपथविधी, PM मोदींसह भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार!
5
काँग्रेसच्या 'पंजा'ला बांधलेला वाघ अन् शिंदेंनी सोडला बाण; 'दसरा मेळावा' टीझरमध्ये ठाकरे निशाण्यावर
6
"संजय राऊत, आता शिंग फुटली तर..."; राज ठाकरेंच्या नेत्याचा उद्धव ठाकरेंना इशारा
7
Nobel Peace Prize 2024: अण्वस्त्रांविरोधात काम करणाऱ्या संस्थेचा नोबेल शांतता पारितोषिकाने सन्मान
8
पीएम सूर्य घर योजनेंतर्गत सोलर पॅनेल बसवायचंय? 'या' नंबरवर मिळेल सर्व माहिती
9
Manu Bhaker चा फॅशन वीकमध्ये जलवा; ऑलिम्पिक मेडलिस्ट खेळाडूचा नवा अवतार
10
हरयाणानंतर महाराष्ट्र जिंकण्यासाठी भाजपाचा खास प्लॅन, या ३० जागांवर देणार विशेष लक्ष, समीकरणं बदलणार? 
11
वक्फ विधेयकावर आता जमियत उलेमा-ए-हिंदचे मत घेणार; राम मंदिराच्या वकिलांनाही जेपीसीच्या बैठकीचे निमंत्रण
12
Harry Brook, PAK vs ENG: "अजून बरीच शतकं ठोकणार..."; पाकिस्तानी गोलंदाजांना 'त्रिशतकवीर' हॅरी ब्रूकने दिला इशारा
13
पॅराग्लायडिंग करत असताना पॅराशूटचा तोल गेला, तरुण खाली कोसळला, पण सुदैवाने वाचले प्राण
14
प्रकाश आंबेडकर यांचे मुख्यमंत्री शिंदेंना पत्र; धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त केली महत्त्वाची मागणी
15
"स्वामींनीच त्याला माझ्यासमोर आणलं", केदार शिंदेंनी सांगितलं सूरज चव्हाणच्या निवडीबद्दल
16
दुसऱ्या प्रेग्नंसीवर व्यक्त झाली आलिया भट; म्हणाली, "भविष्यात सिनेमांसोबतच आणखी..."
17
खामेनेईंना सत्तेवरून हटवण्यासाठी इस्रायलकडून मोहीम, इराणला टारगेट करण्यास मंत्रिमंडळाचा ग्रीन सिग्नल
18
Noel Tata : रतन टाटांचा उत्तराधिकारी ठरला; कोण आहेत टाटा ट्रस्टचे नवे अध्यक्ष नोएल टाटा?
19
Ratan Tata Successor : टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी नोएल टाटा यांची नियुक्ती, संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय
20
Jigra Movie Review: जिगरबाज बहिणीची डेअरिंगबाज कहाणी, आलिया भटचा 'जिगरा' कसा आहे वाचा

मूर्तिजापुरात मोदी लाटेवर भाजपची नौका पार

By admin | Published: May 17, 2014 6:36 PM

मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी संजय धोत्रे यांच्या पारड्यात भरभरून मते टाकल्याचे निकालातून दिसून आले.

मूर्तिजापूर : संपूर्ण देशात असलेली मोदी लाट अकोला लोकसभा मतदारसंघातही तेवढ्याच ताकदीने चालली आणि याच लाटेवर स्वार होऊन भाजपचे विद्यमान खासदार संजय धोत्रे यांनी विजयाची हॅट्ट्रिक नोंदविताना हा गड राखला. मोदी लाटेचा प्रभाव मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातही दिसून आला. या विधानसभा मतदारसंघात येत असलेल्या मूर्तिजापूर आणि बार्शीटाकळी या दोन तालुक्यातील मतदारांनी संजय धोत्रे यांच्या पारड्यात भरभरून मते टाकल्याचे १६ मे रोजी जाहीर झालेल्या निकालातून दिसून आले. या मतदारसंघातील विद्यमान खासदार हरीश पिंपळे हे भाजपचे असल्यामुळे त्यांनी या मतदारसंघात केलेल्या कामांचा फायदा निश्चितच भाजपच्या उमेदवाराला होईल,असा अंदाज राजकीय विश्लेषकांकडून वर्तविण्यात येत होत आणि तो खरादेखील ठरला. वर्ष २००९ मध्ये मूर्तिजापूर मतदारसंघ २० वर्षांसाठी अनुसूचित जातीसाठी राखीव करण्यात आला. या आरक्षित मतदारसंघातून २००९ च्या निवडणुकीत भाजपचे हरीश पिंपळे यांनी विजय संपादन केला होता. त्यापूर्वीही या मतदारसंघातून भाजपचे दोन उमेदवार निवडून आले आहेत. या मतदारसंघात पूर्वी काँग्रेसचा वरचष्मा होता. त्यानंतर मात्र स्थिती बदलत गेली. या मतदारसंघाच्या ५२ वर्षांच्या कालावधीत सतत २३ वर्षे कब्जा करणार्‍या काँग्रेसला बाजूला सारून १५ वर्षांच्या कालावधीत भाजपने जम बसविणे साधी गोष्ट नाही. बार्शीटाकळी आणि मूर्तिजापूर या दोन तालुक्यांचा समावेश असलेल्या मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात यावेळच्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे संजय धोत्रे यांना ७३१२७ मते मिळाली तर भारिप-बमसंचे प्रकाश आंबेडकर यांच्या पारड्यात ४८०३८ मते पडली. तसेच काँग्रेसचे हिदायत पटेल यांना केवळ ३५२४४ मतांवर समाधान मानावे लागले. वर्ष २००९ मध्ये संजय धोत्रे यांना ४२४९६, प्रकाश आंबेडकर यांना ४५०७६ तर बाबासाहेब धाबेकर यांना ३५१४१ मते मिळाली होती. या दोन्ही निवडणुकींचा तुलनात्मकदृष्ट्या अभ्यास केल्यास काँग्रेसला समान मते मिळाली. प्रकाश आंबेडकर यांना यावर्षी ३ हजार मते जास्त मिळाली. संजय धोत्रे यांना यावेळेस ३० हजार मते अधिक मिळाली आहेत. विकास कामे, सहकार क्षेत्राशी असलेला दांडगा संपर्क, जातीय समीकरण, स्वपक्षीय स्थानिक आमदार, समर्थक व कार्यकर्त्यांचा गोतवळा या जमेच्या बाजू असलेले संजय धोत्रे संपूर्ण देशात असलेल्या मोदी लाटेवर स्वार होऊन या मतदारसंघातून तरून गेल्याचे चित्र निकालातून स्पष्ट झाले आहे.