अकोला : भाजपा सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारावर टिका करीत, पंतप्रधान नरेंद्र मोदी देशावरील सर्वात मोठे संकट आहे, असा आरोप भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर यांनी शुक्रवारी येथे केला.
धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सवानिमित्त भारतीय बौध्द महासभा अकोला जिल्हा शाखेच्यावतीने अकोला क्रिकेट क्लब मैदान येथे आयोजित धम्म मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. गत चार वर्षात देशातील ७५ हजार कुटुंब देश सोडून परदेशात गले असून, ते सर्व हिंदू आहेत, सरकारच्या धोरणाला कंटाळून ते देश सोडून गेले असे सांगत, सर्व काळा पैसा पांढरा झाल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात; मात्र पैसा गेला कुठे असा सवाल उपस्थित करीत, हा पैसा अमित शहांकडे तर ठेवला नाहीना, असा आरोपही अॅड.आंबेडकर यांनी केला.
विजया दशमीला रा.स्व.संघाच्यावतीने शस्त्राची पूजा केली केली जाते. शस्त्राची पूजा करणाºया सरसंघाचालक मोहन भागवत यांच्याविरुध्द ‘मोक्का ’का लावला जात नाही, अशी विचारणा करीत, रा.स्व.संघाकडे आतंकवाद्यांची शस्त्र आली कशी, याचे उत्तर सरकारने दिले पाहीजे, अन्यथा जिल्हयाजिल्ह्यात आम्ही हा प्रश्न पेटविणार असल्याचा इशारा अॅड.आंबेडकर यांनी दिला.
देशात ‘ब्लॅकमेलींग’चे राजकारण !देशात ‘ब्लॅकमेलींग’चे राजकारण सुरु झाल्याचा आरोप अॅड.आंबेडकर यांनी केला. पंतप्रधान मोदी एकटे खात नाहीत, दुसºयाला खायला लावतात आणि त्यातील वाटा मागतात.उद्या पाकिस्तान, चायना सोबत युध्द झालेच तर खरेदी केलेली विमाने वापरली पाहीजे; मात्र रिलायन्स कंपनीने विमाने वापरण्याच्या स्थितीत ठेवली नाही तर, सरकारचा अधिकार काय, असा प्रश्न उपस्थित करुन सरकारच्या धोरणावर आंबेडकर यांनी टिका केली.
देश असुरक्षित !सुरक्षेच्या दृष्टभने देश असुरक्षित असल्याचा आरोप अॅड.आंबेडकर यांनी केला.रशियासोबत केलेला मिसाईल करारनामा १५ दिवसांत सरकारने सार्वजनिक करावा, अशी मागणीही त्यांनी केली.