रस्त्यावर चिखल साचल्याने दुचाकी घसरून पडत आहेत. रस्ता खड्डेमय झाला असून वाहनधारकांना वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. गेल्या १५ वर्षांपासून रस्त्याची सार्वजनिक बांधकाम विभागाने डागडुजी केली नाही आणि अनेक वर्षांपासून रस्त्याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे. करतवाडी रेल्वे ते धामना बु. हे दोन्ही गावे चोहोट्टा मार्गावर येतात. या गावातील नागरिकांना दवाखाना व बाजारपेठ व विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी चोहोट्टा येथे जावे लागते. या गावातील नागरिकांना अकोला जाण्यासाठी याच मार्गावरून येणे-जाणे करावी लागते. त्यामुळे या २ किलोमीटर रस्त्याची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
फोटो:
रस्त्याव चिखल साचला असून, खड्डे पडले आहेत. रस्त्याची चाळणी झाली आहे. रस्त्याच्या कामासाठी निधी मंजूर झाला. मात्र प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली नाही. १५ वर्षांपासून रस्त्याची दुरुस्ती केली नाही
- पूर्णाजी खोडके, सामाजिक कार्यकर्ता, धामणा बु.