वाहनांच्या कर्कश आवाजाने नागरिक त्रस्त
अकोला: शहरातील राऊतवाडी ते शासकीय दूध डेअरी मार्गावर अनेक जण वेगाने वाहन चालवत हॉर्नचा कर्कश आवाज करतात. त्यामुळे या मार्गावरील नागरिक त्रस्त झाले आहेत. वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांकडून अशा वाहनांवर कुठलीच कार्यवाही होत नसल्याचेही दिसून येते. वाहतूक पोलिसांनी अशा वाहनधारकांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
खराब रस्त्यामुळे पाण्याची नासाडी
अकोला: खेडकरनगर जवाहननगर चौक परिसरात दररोज टँकरद्वारे पाणी नेले जाते. परंतु येथील रस्ता खराब असल्याने दररोज टँकरमधील पाणी मोठ्या प्रमाणत सांडते. त्यामुळे परिसरात पाण्याची नासाडी तर होतेच, शिवाय रस्त्यावर पाणी सांडल्याने वाहनधारकांनाही त्रास सहन करावा लागत आहे.
जागृती विद्यालयाजवळ कचऱ्याचे ढीग
अकोला: रणपिसेनगर परिसरातील जागृती विद्यालयाजवळ कचऱ्याचे ढीग लागले आहे. घंटा गाडी येऊनही परिसरातील नागरिक शाळेजवळच कचरा टाकत असल्याचे दिसून येते. त्यामुळे परिसरात दुर्गंधीसह डासांचाही प्रादुर्भाव वाढला आहे. परिणामी नागरिकांचेच आरोग्य धोक्यात येत आहे.