अकोला : दोन एक्स्प्रेस गाड्यांना इटारसीजवळ घडलेल्या अपघातानंतर अनेक गाड्या अजूनही अकोला मार्गे धावत आहेत. यामुळे नियमित धावणार्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले असल्याने, सोमवारी अकोला मार्गे धावणार्या अनेक गाड्या मध्य रेल्वे प्रशासनाने रद्द केल्या आहेत. सोमवारी १0 रोजी मुंबईवरून सुटणारी १२१७१ लोकमान्य टिळक टर्मिनस - हावडा एक्स्प्रेस, आठवड्यातून एकदा वाशिम-अकोला मार्गे धावणारी क्रमांक ११४0४ कोल्हापूर - नागपूर रद्द करण्यात आली आहे. तसेच १२१३६ नागपूर-पुणे, १२१३९ सीएसटी मुंबई - नागपूर, १२१४0 नागपूर - सीएसटी मुंबई या एक्स्प्रेस गाड्यादेखील सोमवारी रद्द करण्यात आल्या आहेत. या व्यतिरिक्त सोमवारी एक दिवसाकरिता ५१२८५ भुसावळ - नागपूर व ५१२८५ नागपूर - भुसावळ या पॅसेंजर गाड्यादेखील पूर्णत: रद्द करण्यात आल्या आहेत. इटारसीजवळील अपघातामुळे या मार्गावर इतर गाड्यांचे अवागमन वाढले असल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक प्रभावित झाले आहे. परिणामी या मार्गावर अकोला मार्गे नियमित धावणार्या गाड्या रेल्वे प्रशासनाला रद्द कराव्या लागत असल्याची माहिती भुसावळ मंडळ अधिकार्यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली.
सोमवारी धावणा-या अनेक गाड्या रद्द
By admin | Published: August 10, 2015 1:37 AM