शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआत अजून गोंधळात गोंधळ, २३ मतदारसंघांत उमेदवारच नाही; अर्ज भरायला दोनच दिवस शिल्लक
2
आजचे राशीभविष्य, २८ ऑक्टोबर २०२४: नशीबाची साथ मिळेल, मित्रांशी भेटी होतील, प्रवास घडेल.
3
वरळीत मिलिंद देवरा वि. आदित्य ठाकरे लढत; शिंदेसेनेची दुसरी यादी जाहीर
4
दिवाळी सप्ताह: ४ राशींना सर्वोत्तम वरदान, लाभच लाभ; पद-पैसा वाढ, लक्ष्मी-कुबेर शुभच करतील!
5
काँग्रेसने औरंगाबाद पूर्व, अंधेरी पश्चिमचे उमेदवार बदलले; विधानसभेसाठी चौथी यादी जाहीर
6
कर्जाच्या तणावातून आईची हत्या; आत्महत्येचा प्रयत्न, वरळीतील घटना
7
​​​​​​​देशातील शहरे झाली गॅस चेंबर, ११ शहरांतील हवा धोकादायक
8
नेतान्याहू, थोडी लाज वाटू द्या! हमास हल्ल्यातील बळींच्या स्मरणार्थ कार्यक्रमात आंदोलकांच्या घोषणा
9
रेल्वेत जागा पकडण्यासाठी उडाली झुंबड, मुंबईत चेंगराचेंगरी; १० जखमी, दोन गंभीर
10
अजित पवार गटाकडून आणखी चार उमेदवार जाहीर; गेवराईतून विजयसिंह पंडित, तर पारनेरमधून दाते 
11
दिवाळीला नोटांची तोरणे.. प्रत्येक पक्षासाठी अस्तित्वाची लढाई!
12
चर्चेचे गुऱ्हाळ, नेत्यांचा अहंपणा आघाडीच्या मुळावर!
13
विमानात बॉम्ब ठेवला असल्याच्या खोट्या धमक्या कुठून येतात?
14
३२ जागांवर राष्ट्रवादी वि. राष्ट्रवादी; शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर
15
मन ही मन लड्डू फुटे, हाथों मे फुलझडियां!
16
मनसे ​​​​​​​उमेदवारांची सहावी यादी जाहीर, आतापर्यंत ११० जण रिंगणात
17
वसंत देशमुख यांना पुण्यातून घेतले ताब्यात, जयश्री थोरातांसह ५० जणांविरुद्ध गुन्हा
18
सेमीकंडक्टर उद्योग राखेल समतोल; जगातील सत्तांना उद्देशून परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचे प्रतिपादन
19
ॲडव्हान्स व्होटिंग आणि ८.५ कोटींचं आमिष!
20
'26/11 मुंबई हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर दिले नव्हते, पण आता...', एस जयशंकर स्पष्ट बोलले

पीक विम्याचे पैसे नेट बँकींगद्वारे काढले

By admin | Published: October 07, 2015 11:32 PM

निनावी फोन करून फसवणूक अल्पभूधारक शेतक-याची फसवणूक; बुलडाणा जिल्ह्यातील उंद्री येथील घटना.

उंद्री ( जि. बुलडाणा): निनावी फोन करून माहितीच्या आधारे नेट बँकींगद्वारे अल्पभूधारक शेतकर्‍याच्या खात्यातून पैसे काढून घेतल्याची घटना २ ऑक्टोबर रोजी घडली. याप्रकरणी संबंधित शेतकर्‍याने तक्रार केली आहे. उंद्री येथील रहिवासी शे.एजाज शे.चांद (वय ३८ वर्षे) यांची डासाळा शिवारात तीन एकर शेती आहे. गत वर्षीच्या पीक विम्याचे पैसे त्यांच्या स्थानिक स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत क्र. ३३१८७७७९0७६ या खात्यात २ ऑक्टोबर रोजी ३४६६ रु. अधिक १६0८ रु. असे एकूण ५0७४ रु. शासनाकडून जमा झाले होते व आधीचे खात्यात २४६७ रु. होते, असे त्यांच्या खात्यात एकूण ७५४१ रु. जमा होते. या शेतकर्‍याला सहा महिन्यांपूर्वी एक निनावी फोन येवून त्याने म्हटले, ह्यमी बँक मॅनेजर बोलतो, मला तुमच्या खात्याची संपूर्ण माहिती द्या, अन्यथा तुमचे बँक खाते बंद होईल.ह्ण म्हणून शेतकर्‍याने संपूर्ण माहिती दिली. २ ऑक्टोबरला जेव्हा पैसे जमा झाले तेव्हा अज्ञात भामट्याने नेट बँकींगच्या माध्यमातून आधी २00 रुपये, नंतर ३ ऑक्टोबरला २000 रु. पुढे २000 रु. व लगेच ३000 रु. असे एकूण ७२00 रुपये ट्रान्सफर केले. याबाबत मॅसेज संबंधित शेतकर्‍याच्या मोबाइलवर येताच संबंधित शेतकर्‍याने उंद्री येथील स्टेट बँकेत जाऊन पासबुकात नोंद करून घेतली. त्यात पीक विम्याची रक्कम लंपास झाल्याचे आढळून आले. दोन-तीन घटना उंद्री परिसरामध्ये घडल्या आहेत. तरी या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी आहे.