ऑनलाइन लोकमत
अकोला: जिल्ह्यात अनेक ठिकाणी सोमवार, ५ जून रोजी रात्री मेघगर्जनेसह मुसळधार पावसाला सुरूवात झाली. गतसप्ताहात कमी-अधिक प्रमाणात जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली असली तरी, सोमवारी रात्री अकोला शहरासह आकोट, शिर्ला, पातूर व जिल्ह्यात अनेक ठिकाणी झालेल्या मुसळधार पावसामुळे कांदा, केळी व अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या या पावसामुळे अनेक गावांतील घरांवरील टिनपत्रे उडाल्याचीही माहिती आहे.