अकोला: जिल्हय़ातील विविध गावांमध्ये वादळी वार्यासह मान्सूनपूर्व पावसाने शुक्रवारी हजेरी लावली. अकोला तालुक्यातील येवळण गावाला वादळी वार्यासह मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा बसला. गावातील आठ ते दहा घरांवरील टिनपत्रे उडून गेली असून, काही विद्युत खांबही पडले.शुक्रवारी सायंकाळी वादळी वार्यासह मान्सूनपूर्व पाऊस बरसला. वादळी वार्यामुळे येळवण येथे आठ ते दहा घरांवरील टिनपत्रे उडून गेली तर काही घरांच्या भिंती पडल्या असून, गावातील काही विद्युत खांबदेखील पडले. त्यामुळे वादळी वार्यासह मान्सूनपूर्व पावसाचा गावाला तडाखा बसला.विद्युत खांब पडल्याने गावातील विद्युत पुरवठा खंडित झाला. महावितरणच्या अभियंत्यांनी गावात जाऊन वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू केले.दरम्यान अकोला शहर आणि परिसरातही शुक्रवारी सायंकाळी वादळी वार्यासह मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली.
वादळी वा-यासह मान्सूनपूर्व पावसाचा येळवणला तडाखा
By admin | Published: June 04, 2016 2:20 AM