अकोला: पाऊस सुरू होण्यास झालेला विलंब आणि त्यानंतर पावसात खंड पडल्याने, जिल्ह्यात मूग व उडीद पिकाच्या पेरण्या उलटल्याने, यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यात मूग व उडिदाचे उत्पादन बुडाले. त्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर रब्बी पेरणीचा खर्च भागविण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. त्यानुषंगाने मूग-उडीद उत्पादक शेतकऱ्यांना रब्बी पेरणीसाठी शासनाकडून मदत देण्याची मागणी होत आहे.यावर्षीच्या पावसाळ्यात जिल्ह्यात पाऊस सुरू होण्यास विलंब झाला. रिमझिम पावसात खरीप पेरण्या झाल्यानंतर गत २३ जुलैपर्यंत पावसात खंड पडल्याने, जिल्ह्यातील बहुतांश भागत मूग व उडीद पिकाच्या पेरण्या उलटल्या होत्या. तसेच अनेक शेतकºयांना मूग व उडीद पिकाची वखरणी करावी लागली. त्यामुळे यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यात मूग, उडीद पिकाचे उत्पादन बुडाले असून, पेरणीचा खर्चही वसूल झाला नसल्याने, जिल्ह्यातील मूग, उडीद उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. रब्बी हंगामातील पेरणी तोंडावर आली असून, रब्बी पेरणीचा खर्च कसा भागविणार, असा प्रश्न आर्थिक अडचणीत सापडलेल्या मूग, उडीद उत्पादक शेतकºयांसमोर निर्माण झाला आहे. त्यानुषंगाने अडचणीत सापडलेल्या मूग व उडीद उत्पादक शेतकºयांना रब्बी पेरणीसाठी शासनामार्फत मदत देण्यात यावी, अशी मागणी शेतकºयांकडून होत आहे.पावसात खंड पडल्याने शेतकºयांना मूग व उडीद पिकाची वखरणी करावी लागली. मूग-उडीद पिकाचे उत्पादन बुडाल्याने, शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे रब्बी पेरणीसाठी मूग व उडीद उत्पादक शेतकºयांना शासनाकडून मदत मिळाली पाहिजे.- मनोज तायडेशेतकरी जागर मंच, अकोला.