अकोला : यंदा पावसाळा लांबल्यामुळे मूग, उडिदाचा पेरा घटला असून, या क्षेत्रावर कापसाचा पेरा वाढणार आहे. शेतकर्यांनी कापूस पेरणीची तयारी केली असून, या पेरणीकरिता आतातरी पाऊस यावा, या प्रतीक्षेत शेतकरी आहे. या खरीप हंगामासाठी कृषी विभागाने जिल्हय़ातील ४ लाख ८३ हजार हेक्टरकरिता विविध पिकांचे नियोजन केले आहे. कापसाचे क्षेत्र ४0 हजार हेक्टरने वाढण्याची शक्यता असल्यामुळे कृषी विभागाने अगोदरच वाढीव बियाण्यांचे नियोजन केले आहे; परंतु पावसाळा लांबल्याने कापसाच्या पेर्यात आणखी वाढ होणार आहे. कृषी विभागाने मूग २,४६0, उडीद ५७७ क्विंटल बियाणे मागविले होते. तथापि या पिकाची वेळ निघून गेली आहे. मूग, उडिदाचे पीक पोळ्य़ाला हाताशी येत असते. हे नगदी पीक शेतकर्यांना दिलासा देणारे ठरते; परंतु गेल्या वर्षी अतवृष्टीमुळे मूग, उडीद, ज्वारीचे पीक वाया गेले होते. त्यामुळे यावर्षी या पिकावर शेतकर्यांची भिस्त होती; परंतु यावर्षी पावसाळा लांबल्यामुळे या पिकांचा पेरा घटला आहे. या क्षेत्रावर शेतकर्यांनी कापूस या पिकालाच पसंती दिली आहे.
मूग, उडिदाचे क्षेत्र घटले!
By admin | Published: July 08, 2014 12:16 AM