अकोला : मागील आठवडयापासून सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळे पश्चिम विदर्भातील गहू, हरभरा या पिकांसह भाजीपाला, फळपिकांचे जवळपास ७५ हजार हेक्टरच्यावर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, शुक्रवारी रात्री अकोला जिल्ह्यात पाऊण तास वादळी पाऊस झाला. पश्चिम विदर्भातील अकोला, वाशिम, बुलडाणा, यवतमाळ आणि अमरावती याच पाच जिल्हय़ात गेल्या पावसाळ्य़ात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने सर्वच खरीप पिकांचे उत्पादन घटले होते. रब्बी पिकावर आस लावून बसलेल्या शेतकर्यांना या पावसाने पीक एन काढणीच्यावेळी फटका दिल्याने रब्बी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. १ मार्चपर्यंत यवतमाळ १७,४४६ हेक्टर, अमरावती जिल्हय़ात ७ हजार तर अकोला जिल्ह्यात १,८३0 हेक्टर क्षेत्रावरील पिकांना या पावसाचा फटका बसला आहे. यामध्ये १३,२00 हेक्टर हरभर्याचे क्षेत्र असून, गव्हाचे क्षेत्र १२,६00 आहे. १८१ हेक्टरवरील फळ पिकांचे नुकसान झाले होते तर २0८ हेक्टर क्षेत्रावरील भाजीपाला व इतर पिकांचे नुकसान झाले होते.पण हा पाऊस ूउसंतच देत नसून , वादळीवार्यासह गारपीट होत असल्याने सर्वच पिकांचे नुकसान होत आहे. गत आठ दिवसात पश्चिम विदर्भातील पीक नुकसानाचा आकडा हा पन्नास हजार हेक्टरच्यावर गेला आहे. विभागीय कृषी सहसंचालक एस.आर. सरदार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अवकाळी पावसाने पश्चिम विदर्भातील गहू, हरभरा पिकांचे नुकसान झाले असल्याचे सांगीतले. मात्र पाऊस सुरू च असल्याने सर्वेक्षण व नुकसानाचे आकडे बदलत असल्याचे स्पष्ट केले. *पिकांची काढणी रखडली रब्बी हंगामातील गहू, हरभरा आणि खरीपातील तूर काढणी सध्या सुरू आहे. पण हा पाऊस उसंत देत नसल्याने आणि पिके शेतात अक्षरश: आडवी झाल्याने शेतकर्यांनी हवालदिल झाला आहे. पावसामुळे काढणी रखडली आहे.
पश्चिम विदर्भात ७५ हजार हेक्टरपेक्षा अधिक पिकाचे नुकसान !
By admin | Published: March 15, 2015 12:02 AM