अकोला : प्रवाशांच्या सुविधेसाठी मध्य रेल्वेने १९ व २० जानेवरीपासून आणखी तीन विशेष प्रवासी गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या मुंबई ते नागपूर, पुणे ते नागपूर व नागपूर ते अहमदाबाद दरम्यान चालवण्यात येणार आहेत. या गाड्या पूर्णपणे आरक्षीत असणार असून, १८ जानेवारीपासून आरक्षण सुरु होणार आहे.
मुंबई-नागपूर विशेष गाडी (दररोज)
गाडी क्रमांक ०२१६९ डाऊन मुंबई-नागपूर विशेष गाडी २० जानेवारीपासून पुढील आदेशापर्यंत मुंबई हून दररोज ०२.५५ वाजता रवाना होईल आणि नागपूरला दुसऱ्या दिवशी ०५.४५ वाजता पोहोचेल.
गाडी क्रमांक ०२१७० अप नागपूर-मुंबई विशेष गाडी २० जानेवारीपासून पुढील आदेशापर्यंत नागपूरहुन दररोज २१.१० वाजता रवाना होईल आणि मुंबईला दुसऱ्या दिवशी १२.०० वाजता पोहोचेल.
या गाडीला देवळाली,नाशिक,निफाड,लासलगाव,मनमाड,नांदगाव,चाळीसगाव,पाचोरा,जळगाव,भुसावळ, मलकापूर,नांदुरा,शेगाव,अकोला,मुर्तीजापुर,बडनेरा या ठिकाणी थांबा असेल
नागपूर-अहमदाबाद विशेष गाडी (साप्ताहिक)
गाडी क्रमांक ०११३७ अप नागपूर-अहमदाबाद विशेष गाडी २० जानेवारीपासून पुढील आदेशापर्यंत नागपूरहून दर बुधवारी ०८.१५ वाजता रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी अहमदाबादला ००.३५ वाचता पोहोचेल.
गाडी क्रमांक ०११३८ डाउन अहमदाबाद-नागपूर विशेष गाडी २० जानेवारीपासून पुढील आदेशापर्यंत अहमदाबादहुन दर गुरुवारला १८.३० वाजता रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी नागपूरला १०.२५ वाजता पोहोचेल. या गाडीला बडनेरा,अकोला,शेगाव,मलकापूर,भुसावळ, जळगाव येथे थांबा असणार आहे.
नागपूर-पुणे सुपरफास्ट एसी विशेष गाडी
गाडी क्रमांक ०२११४ अप नागपूर-पुणे एसी विशेष गाडी १९ जानेवारीपासून पुढील आदेशापर्यंत नागपूरहून दर मंगळवार,शुक्रवार,रविवार ला ०६.०० वाजता रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी पुणे ला ०९.०५ वाचता पोहोचेल.
गाडी क्रमांक ०२११३ डाउन पुणे-नागपूर एसी विशेष गाडी २० जानेवारीपासून पुढील आदेशापर्यंत पुणेहून दर बुधवार,शनिवार,सोमवार ला १७.४० वाजता रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी नागपूरला ०९.१० वाचता पोहोचेल. या गाडीला बडनेरा, अकोला, शेगाव, भुसावळ, मनमाड येथे थांबा असणार आहे.