ठळक मुद्देशनिवारी सकाळी वाजल्यापासून दगडी पुलाच्या जवळील गुलजार पुरा परिसरातील मोर्णाच्या काठावर स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.जेसीबीव्दारे काढण्यात आलेली जलकुंभी तसेच प्लॅस्टिकचा कचरा नागरीकांनी नदीच्या काठावर जमा केला. जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी सक्रीय सहभाग घेऊन मोर्णा नदीतील जलकुंभी बाहेर काढली.
अकोला: मागील महिन्याच्या १३ तारखेपासून लोकसहभागातून सुरु झालेल्या मोर्णा स्वच्छता मोहिमेला नागरीकांचा प्रचंड प्रतिसाद लाभत असून, शनिवारी दगडी पुलाच्या जवळील गुलजार पुरा परिसरातील मोर्णाच्या काठावर स्वच्छता करण्यात आली.शनिवारी सकाळी वाजल्यापासून दगडी पुलाच्या जवळील गुलजार पुरा परिसरातील मोर्णाच्या काठावर स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. यावेळी जेसीबीव्दारे काढण्यात आलेली जलकुंभी तसेच प्लॅस्टिकचा कचरा नागरीकांनी नदीच्या काठावर जमा केला. जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी सक्रीय सहभाग घेऊन मोर्णा नदीतील जलकुंभी बाहेर काढली. नागरीकांसोबतच पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील, महापौर विजय अग्रवाल , माजी नगराध्यक्ष हरिश अलिमचंदानी, डॉ. अशोक ओळंबे, उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे , तहसिलदार राजेश्वर हांडे, तहसिलदार रामेश्वर पुरी ,नगरसेवक अजय रामटेके, नगरसेवक शशी चोपडे,नगरसेविका उषा विरक ,नायब तहसिलदार राजेद्र इंगळे, मनपाचे कैलास पुंडे, ओंकारेश्वर शिव भक्त मंडळाचे कार्यकर्ते , पराग गवई मित्र परिवार यांच्यासह विविध सामाजिक संस्था ,महसुल व मनपा कर्मचारी व अधिका-यांचा प्रचंड प्रतिसाद स्वच्छता मोहिमेला लाभला आहे. यावेळी त्यांना जाणता राजाचे कलाकार तसेच जय गजानन मित्र मंडळाचे अध्यक्ष महेश अभ्यंकरसह त्यांचे मित्र , संतोष कुटे कोचिंग क्लासेसचे विद्यार्थी, सामाजिक संस्थाचे कार्यकर्ते, गुलजार पुºयातील रहिवासी, पत्रकार संघाचे अध्यक्ष सिध्दार्थ शर्मा, महसुल व मनपा कर्मचारी सहभागी झाले होते.मुख्यमंत्री, वित्तमंत्र्यांचे आभारयावेळी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले की, मोर्णा नदीच्या ८ किलोमीटर क्षेत्रातील ६ किलोमीटरचे काम जवळजवळ पुर्ण झाले आहे. मार्च व एप्रिल महिन्यात राहिलेल्या २ किलोमीटरचे काम करण्यात येणार आहे. नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात मोर्णा नदी स्वच्छता मोहिमेसाठी मदतीचा हात देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही अकोलेकरांसाठी अभिमानाची बाब आहे, असे सांगून अकोलेकरांच्या वतीने त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले.संस्था, संघटनांचा सहभागया मोहिमेत राष्ट्रीय चर्मकार संघ शाखा अकोला,भावसार महिला मंडळ जुने शहर, लघुव्यवसायी व्यापारी संघटना, सेवा फाउंडेशन , क्रिडा भारती, नॅशनल मोबाईल मेडिकल युनिट, विदर्भ पटवारी संघटना ,निमाचे डॉ. मिलींद बडगुजर, डॉ. वर्षा बडगुजर, डॉ. गुप्ता, डॉ.चतुर्वेदी, गव्यम सोशल वेलफेअर सोसायटी यांच्यासह व्यापारी, बचतगटाच्या महिला, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, शासकीय अधिकारी/कर्मचारी, विविध क्षेत्रातील प्रतिष्ठीत, वयोवृध्द नागरिक, विदयार्थी आणि सर्वसामान्य नागरिकही सहभागी झाले होते. केवळ अकोला शहरातीलच नव्हे तर संपूर्ण जिल्हाभरातून अनेकजण स्वच्छतेसाठी पुढे येवून आपला सक्रीय सहभाग नोंदविला. श्रमदान करणा-या नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे नाईक, निलेश मगर यांचे सक्रीय योगदान लाभले. तसेच सानिया मल्टीपर्पज फाऊंडेशनच्या रिना धोटे, आयुवेर्दिक रूग्णालय अकोला, वेदाश्रय फिल्म्स, गरुदेव मॉर्निग क्लब, निर्भय बनो जनआंदोलनचे कार्यकर्ते दिपशीला महिला वस्तीस्तर संघ, मनपाचे आरोग्य निरिक्षक, झोन अधिकारी, महाराष्ट्र राज्य शहर व ग्रामीण पत्रकार संघाचे संजय देशमुख, शाम शर्मा, विनोद गुप्ता तसेच उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांच्या पत्नी निता खडसे ,मुलगी साना , दिपाली बेलखेडे यांनी मोर्णा स्वच्छतेमध्ये सहभागी होवून श्रमदान केले.