ठळक मुद्दे सुमारे दोन ते अडीच हजार लोकांनी मोर्णा नदीची स्वच्छता केली.नदीकाठच्या निमवाडी आणि लक्झरी बसस्टँडच्या मागील बाजूला नदीकाठावर स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.आयडीबीआय बँकेच्यावतीने श्रमदान करणाऱ्यांसाठी पाण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती.
अकोला : जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या प्रयत्नातून मोर्णा नदीची लोकसहभागातून झपाट्याने स्वच्छता होत आहे. मोर्णा स्वच्छता मिशनच्या शनिवारी सुरु झालेल्या पाचव्या टप्प्याच्या मोहिमेलाही अकोलेकरांचा मोठा प्रतिसाद लाभला. लोकप्रतिनिधी, विविध सामाजिक संस्था, शासकीय कार्यालयाचे कर्मचारी, विद्यार्थी महिला, सर्वसामान्य नागरिकांनी उत्स्फुर्तपणे मोर्णा नदीची स्वच्छता केली. शनिवारी सकाळी ८ वाजता मोर्णाच्या स्वच्छतेला प्रारंभ झाला. पुलाला लागून असणाºया नदीकाठच्या निमवाडी आणि लक्झरी बसस्टँडच्या मागील बाजूला असणाºया नदीकाठावर स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. यावेळी जेसीबीव्दारे काढण्यात आलेला कचरा लोकांनी वाहनांमध्ये भरुन दिला. तसेच नदीपात्रात उतरुन शेकडो लोकांनी सांघिकरित्या कचरा बाहेर काढला. स्वत: जिल्हाधिकाºयांनी बोटीत बसून स्वच्छतेसाठी लोकांनी प्रोत्साहित केले. तसेच मोठया प्रमाणात नदीतील कचराही बाहेर काढला. या मोहिमेत मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती, मनपा आयुक्त जितेंद्र वाघ, माजी नगराध्यक्ष हरिष अलीमचंदानी, नगरसेविका उषाताई विरक, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष पवार, उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, मनपाचे अतिरिक्त आयुक्त दिलीप पाटील, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष शौकत अली मीर, तहसिलदार राहूल तायडे, रामेश्वर पुरी, उपमुख्य कार्यकारी कुळकर्णी, महाराष्ट्र राज्य शहर व ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष संजय देशमुख, यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक, व्यापारी, बचतगटाच्या महिला, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, शासकीय अधिकारी/कर्मचारी, पोलीस, विविध क्षेत्रातील प्रतिष्ठीत नागरिक, वयोवृध्द नागरिक, विदयार्थी आणि सर्वसामान्य नागरिक सहभागी झाले होते. केवळ अकोला शहरातीलच नव्हे तर संपूर्ण जिल्हाभरातून अनेकजण स्वच्छतेसाठी पुढे आले होते. सुमारे दोन ते अडीच हजार लोकांनी मोणार्ची स्वच्छता केली. विशेष बाब म्हणजे आयडीबीआय बँकेच्यावतीने श्रमदान करणाºयांसाठी पाण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती.साबरतीच्या धर्तीवर मोर्णाचा विकास करणार - जिल्हाधिकारी१३ जानेवारीपासून सुरु झालेल्या मोर्णा नदीच्या स्वच्छतेसाठी लोकांनी दिलेला प्रतिसाद चकीत करणार आहे, अशी उत्स्फुर्त दाद देत जिल्हाधिकारी म्हणाले की, लोकप्रतिनिधी आणि जनता यांच्या योगदानामुळे मोर्णा आता स्वच्छ होण्याच्या वाटेवर आहे. आनंदाची बाब म्हणजे मोर्णाच्या विकासासाठी खासदार संजय धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा आणि आमदार रणधीर सावरकर यांनी प्रत्येकी पंधरा लाख रुपयांचा निधी जाहीर केला आहे. तसेच माजी राज्यमंत्री बाबासाहेब धाबेकर यांनी रुपये एक लाख दिले आहेत. या निधीतून मोर्णाचा किनारा सुंदर केला जाणार आहे, यामध्ये प्रामुख्याने घाटाची निर्मिती, बगीचा, लाईटची व्यवस्था आदी कामे केली जाणार आहेत. भविष्यात गोमती व साबरमती नदीच्या धर्तीवर मोर्णाचा कायापालट केला जाणार आहे.उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांचा नदीकाठी वाढदिवससाजरा अकोल्याचे उपविभागीय अधिकारी तथा मोर्णा स्वच्छता मोहिमेत झपाटून काम करणारे प्रा. संजय खडसे यांचा वाढदिवस आज मोर्णा नदी किनारी अत्यंत आनंदाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. नदी काठी छोटेखानी कार्यक्रमात त्यांच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी यांच्यासह सर्व अधिकारी, कर्मचारी आणि श्रमदात्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.यांचा सक्रिय सहभागमोहिमेत पिंजर येथील संत गाडगेबाबा नैसर्गिक आपत्ती बचाव पथक, मूर्तिजापूर येथील येथील गाडगे बाबा स्वच्छता मंडळ स्वच्छता अभियान पथक, एलआरटी महाविद्यालय, शिवाजी महाविद्यालय आणि सीताबाई आर्टस महाविद्यालय एनएसएसचे विद्यार्थी, हिरकणी वस्तीस्तर संघ, शौर्य संस्था, प्रबुध्द भारत बहुउद्देशिय संस्था, लघु व्यवसाय व्यापारी विकास संस्था, संस्कार इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी, विदर्भ भूमी अभिलेख कर्मचारी संघटना, वेदाश्रम फिल्म असोसिएशन, पोलीस पाटील संघटना, विदर्भ पटवारी संघटना, सेवा फाउंडेशन, जिल्हा परिषद कर्मचारी संघटना, समृध्दी वस्तीस्तर संघटना, जिजाऊ ब्रिगेड, आयुर्वेदिक महाविद्यालय, पत्रकार संघटनांचे प्रतिनिधी, स्वस्त धान्य दुकानदार संघटना व केरोसीन डिलर संघटना, संकल्प प्रतिष्ठानचे सदस्य, श्रीकृपा पेट्रोल पंपाचे कर्मचारी आणि मनपाचे सफाई कर्मचारी सहभागी झाले होते.
आयडीआय बँकेने केली पाण्याची व्यवस्थाविशेष बाब म्हणजे आयडीबीआय बँकेच्यावतीने श्रमदान करणाºयांसाठी पाण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. कुंदन रामटेके, मंदार सावजी, प्रदिप यादव, मनिष अदानी, राकेश सोनवणे, अश्वजीत गवई, दिपक चतूर, सुनिल कुलकर्णी, अनिल मोटे, गोवर्धन इंगळे, रिची कोहली, राजेश अग्रवाल, रवी कवाडे, संदेश चाकर, दिनेश सिरसाट, दंदी यांनी सहभाग नोंदवून पाण्याचे वितरण केले.