शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
3
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
4
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
5
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
6
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
7
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
8
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
9
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
10
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
11
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
12
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

अकोल्यात खासदार आमदारांनी हाती घेतले टोपले, मोरणा नदी स्वछता मिशनला सुरवात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2018 9:57 AM

शहराच्या मध्यभागातून वाहणार्‍या मोरणा नदीच्या स्वच्छता मिशनचा निमवाडीस्थित लक्झरी बस स्टॅँडमागे शनिवारी सकाळी ८ वाजता श्रीगणेशा झाला आहे

अकोला : शहराच्या मध्यभागातून वाहणार्‍या मोरणा नदीच्या स्वच्छता मिशनचा निमवाडीस्थित लक्झरी बस स्टॅँडमागे शनिवारी सकाळी ८ वाजता श्रीगणेशा झाला आहे. या मोहिमेत अकोलेकर मोठय़ा संख्येने सहभागी झाले आहेतजिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या या अभियानात  खासदार संजय धोत्रे, महापौर विजय अग्रवाल, आमदार गोपीकिशन बाजोरिया, आ. गोवर्धन शर्मा,आ. रणधीर सावरकर, महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ, सर्वपक्षीय नगरसेवक विविध सामाजीक संस्था यांनी पुढाकार घेतला आहे सकाळी 8 वाजता स्वच्छता मोहिमेला प्रारंभ झालाकधीकाळी शहराची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणार्‍या मोर्णा नदीची शहरातील सांडपाण्यामुळे दुरवस्था झाली आहे. नदीपात्रात जलकुंभीसह प्लास्टिक पिशव्यांचा खच जमा झाला असून, पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे दुर्गंधीमुळे नदीकाठच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. लोकसहभागातून मोर्णा नदीची स्वच्छता करण्यासाठी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी पुढाकार घेत शहरातील राजकीय, अराजकीय संस्था, संघटनांसह अकोलेरांना आवाहन केले होते जिल्हाधिकार्‍यांच्या आवाहनाला अकोलेकरांनी प्रतिसाद दिला असून, शनिवारी सकाळी ८ वाजता मोर्णा नदीच्या स्वच्छता मोहिमेला प्रारंभ झाला आहे. 

१४ पथकांचे गठनस्वच्छता मोहिमेसाठी  तहसीलदारांच्या नियंत्रणाखाली १४ पथकांचे गठन करण्यात आले असून, तहसीलदार, मनपाचे क्षेत्रीय अधिकारी, आरोग्य निरीक्षक यांच्या समन्वयातून विविध १४ ठिकाणी साफसफाई मोहीम सुरू झाली आहे

सेवाभावी संस्थांचा पाठिंबा

मोरणा नदी स्वच्छता मिशनला शहरातील अनेक सेवाभावी संस्था, पत्रकार संघटना, कच्छी मेमन जमात, विविध शासकीय अधिकारी, कर्मचारी संघटना, शिक्षक संघटना आदींनी पाठिंबा दिला आहे. ट्रॅक्टर वाहतूक संघटनेने २0 वाहने, महामार्गांची कामे करणार्‍या संघटनेने पोकलेन तसेच सहा जेसीबी विनामूल्य उपलब्ध करून दिली आहेत. नेहरू पार्कचे संचालक बी.एस. देशमुख यांनी जलकुंभी काढणारे यंत्र उपलब्ध करून दिले आहे.

अनुभवी कामगार नदीतील जलकुंभी काढण्यासाठी अनुभवी कामगार व जेसीबीची मदत घेतली जात आहे. त्यानंतर काठावरील जलकुंभी नागरिकांच्या मदतीने मनपाच्या ट्रॅक्टर व घंटागाडीत जमा केली जात आहे  नागरिकांच्या सुविधेसाठी सर्पमित्र पथक, वैद्यकीय सहाय्यता पथक, पाणी व्यवस्थापन, नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन पथक नदीकाठी सज्ज आहे.

टॅग्स :Morna Swachata Missionमोरणा स्वछता मोहीम