अकोला: औषधांचा अभाव, डॉक्टरांची हलगर्जी अशा विविध कारणांनी चर्चेत असलेल्या सर्वोपचार रुग्णालयात डासांचा ताप वाढला आहे. डासांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे डेंग्यू, मलेरियाची भीती वाढली असून, रुग्णांसोबतच डॉक्टरही हैराण झाले आहेत.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात अस्वच्छतेची समस्या दिवसेंदिवस वाढतच आहे. महाविद्यालयाची प्रशासकीय इमारत आणि काही वॉर्ड सोडल्यास इतरत्र अस्वच्छता अन् दुर्गंधी पसरलेली आहे. स्वच्छतागृहातील सांडपाणी रुग्णालय परिसरातच साचून आहे, तर याच परिसरात लहान-मोठे झुडपेही वाढलेले आहेत. त्यामुळे डास आणि किटकांसाठी हे वातावरण पोषक ठरत असून, रुग्णालयात त्यांचा ताप वाढला आहे. त्यामुळे रुग्णांसोबतच डॉक्टर अन् इतर कर्मचाऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. शिवाय, रात्रीच्या वेळी रुग्णालय परिसरात झोपलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांनाही डासांचा त्रास सहन करावा लागत असून, त्यांना डेंग्यू व मलेरियासारख्या आजारांची भीती सतावत आहे.डासांचा बंदोबस्त नाहीरुग्णालय परिसरात साचलेले सांडपाणी आणि अस्वच्छतेमुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. येथे स्वच्छता झाली, तरी काही वॉर्डात आणि महाविद्यालयाच्या प्रशासकीय इमारतीमध्येच. त्यामुळे समस्येची मूळ केंद्र ठरणाºया जागांकडे दुर्लक्षच होत आहे. डासांचा बंदोबस्त लावायचा असेल, तर या ठिकाणांची स्वच्छता करणे गरजेचे आहे.जिल्हा स्त्री रुग्णालयातही हीच स्थितीजिल्हा स्त्री रुग्णालयातही हीच स्थित आहे. डासांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे येथे गर्भवतींसह नवजात बालकांनाही धोका निर्माण झाला आहे; परंतु येथेही डासांच्या वाढत्या प्रादुर्भावाकाडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.झुडपांकडे दुर्लक्षसर्वोपचार रुग्णालयात प्रशासकीय इमारतीच्या मागील बाजूस लहान-मोठी झुडपे वाढलेली आहेत. या झुडपांच्या शेजारीच सांडपाण्याचे डबके साचलेले आहेत; मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. परिणामी डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे.स्वच्छतागृहांची दुरवस्थासर्वोपचार रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक दोन, तीन परिसरात असलेल्या स्वच्छतागृहांची दुरवस्था झालेली आहे. यातील दूषित पाणी बाहेर येत असल्याने दुर्गंधी पसरली आहे.