सर्वांत कमी ॲक्टिव्ह रुग्ण यवतमाळ जिल्ह्यात
कोविडच्या दुसऱ्या लाटेची सुरुवात अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यांतून झाली होती. त्यानंतर उर्वरित विदर्भ आणि महाराष्ट्रात कोरोनाचा फैलाव झाला होता. मात्र, सद्य:स्थितीत इतर जिल्ह्यांच्या तुलनेत यवतमाळ जिल्ह्याची स्थिती चांगली दिसून येत आहे. यवतमाळ जिल्ह्यात सद्य:स्थितीत केवळ १९ रुग्ण उपचार घेत असून, नव्याने पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांची संख्याही कमी आहे.
जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांची स्थिती
जिल्हा - ॲक्टिव्ह रुग्ण
गडचिरोली - १५१
गोंदिया - २८
वर्धा - ३८
यवतमाळ - १९
अकोला - ४४
अमरावती - २८६
बुलडाणा - ७७
वाशिम - १२६
नागपूर - १५०