ग्रामीण रस्ते खराब
अकोला : ग्रामीण भागातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. जागोजागी पडलेले खड्डे आणि उखडलेली गिट्टी यातून मार्ग काढताना वाहनधारकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. ही समस्या मार्गी लावण्याची मागणी करण्यात येत आहे.
रोहित्र धोकादायक
अकोला : शहराच्या काही भागांतील वीज रोहित्र धोकादायक ठरत आहे. काही ठिकाणी फलक उघडे, तर काही ठिकाणी जमिनीला टेकलेल्या रोहित्रामुळे केव्हा अपघात होईल, याचा नेम नाही. याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.
जिल्ह्यात शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा
यवतमाळ : गत काही दिवसांपासून जिल्ह्यामध्ये पावसाने दडी मारली आहे. ढग दाटून येतात; मात्र पाऊस बरसतच नाही. यामुळे शेतशिवारात पेरणी केल्यानंतर पावसाअभावी बियाणे उगवलेच नाही. यामुळे पेरणी वाया जाण्याचा धोका वाढला आहे. पाऊसच नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. आता नव्याने पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांकडे बियाणे उपलब्ध नाहीत. बियाणांच्या खरेदीसाठी लागणारा पैसाही शेतकऱ्यांकडे नाही.
जिल्ह्यातील वृक्षलागवड घटली
अकोला : वनविभागाकडून दरवर्षी मोठ्या प्रमाणात वृक्षांची लागवड केली जाते. याकरिता प्रत्येक विभागाला नियोजन ठरवून देण्यात येत होते. यावर्षी रोपवाटिकेमध्ये पुरेशा प्रमाणात रोप उपलब्ध नाही. यामुळे वृक्षलागवड करताना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. यातून जिल्ह्यातील वृक्षलागवडीचे प्रमाण घटले आहे. याचा परिणाम पर्यावरणावर होणार आहे.