लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : बार्शिटाकळी तालुक्यातल्या राजनखेड येथील लालसिंग भगा राठोड यांची दोन महिन्यांपूर्वी हत्या करण्यात आली; मात्र आरोपींना अद्याप अटक करण्यात आली नाही. त्यामुळे आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी मृतक लालसिंग राठोड यांची पत्नी उषा राठोड व मुलगा किरण राठोड या ‘माय-लेकां’नी सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले.बार्शिटाकळी तालुक्यातील राजनखेड येथील लालसिंग भगा राठोड यांची गत ६ डिसेंबर २0१७ रोजी हत्या करण्यात आली. यासंदर्भात मृतकाचा मुलगा किरण लालसिंग राठोड यांनी गत ७ डिसेंबर रोजी बार्शिटाकळी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावेळी पोलिसांनी कोणावर संशय आहे, असे विचारले असता, किरण राठोड यांनी रामा नाभरे व वसंता मदने यांची नावे सांगितली. त्यानंतर पोलिसांनी मृतक इसमाच्या पत्नीसह कुटुंबातील इतर सदस्यांचे बयान नोंदविले आणि अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. संशयितांविरुद्ध पुरावे देऊनही, संबंधित आरोपींना अद्याप अटक करण्यात आली नाही. त्यामुळे संबंधित आरोपींना अटक करण्यात यावी व न्याय देण्यात यावा, या मागणीसाठी मृतक लालसिंग राठोड यांची पत्नी उषा लालसिंग राठोड व त्यांचा मुलगा किरण लालसिंग राठोड या माय-लेकांनी सोमवार, ५ फेब्रुवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
‘माय-लेका’चे उपोषण सुरू; हत्या प्रकरणातील आरोपींना अटक करण्याची मागणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2018 8:55 PM
अकोला : बाश्रीटाकळी तालुक्यातल्या राजनखेड येथील लालसिंग भगा राठोड यांची दोन महिन्यांपूर्वी हत्या करण्यात आली; मात्र आरोपींना अद्याप अटक करण्यात आली नाही. त्यामुळे आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी मृतक लालसिंग राठोड यांची पत्नी उषा राठोड व मुलगा किरण राठोड या ‘माय-लेकां’नी सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले.
ठळक मुद्देबार्शिटाकळी तालुक्यातील लालसिंग भगा राठोड हत्या प्रकरणहत्या करणारे आरोपी अजूनही मोकाट - आरोप