ठळक मुद्देजिल्हाधिकार्यांनी दिला जिल्ह्याच्या पालकत्वाचा परिचय
मूर्तिजापूर : मूर्तिजापूर-अकोला महामार्गावर ११ ऑक्टोबर रोजी मोटारसायकल व ऑटोरीक्षाचा अपघात होऊन, त्यात आठ जण जखमी झाले होते. त्या जखमींना या मार्गाने वाहनातून येणारे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी त्यांच्या वाहनातून मूर्तिजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवून जिल्ह्याच्या पालकत्वाचा परिचय दिला. जिल्हाधिकार्यांची मदत ऐनवेळी मिळाल्याने जखमींना लवकर उपचार मिळाला.जिल्हाधिकारी पाण्डेय यांनी बुधवारी अमरावतीकडून अकोल्याकडे येत असताना रस्ता अपघातात जखमी झालेल्या रुग्णांना शासकीय वाहनाने मूर्तिजापूरच्या उप जिल्हा रुग्णालयात पोहोचवून भर पावसात मदत केली, हे विशेष.