अकोला : सोमवारी दि.१९ फे ब्रुवारी रोजी होणाऱ्या शिवजयंतीसाठी अकोला नगरी सज्ज झाली असून त्यानिमित्ताने शहरात विविध कार्यकमांचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व जातीधर्माच्या लोकांनी या जाणता राजा असलेल्या शिवजयंती कार्यक्रमात सहभागी करून घेण्याच्या जनजागृतीसाठी रविवारी शहरातून भव्य मिरवणूक काढली जाणार आहे. अशी माहिती शनिवारी मराठा सेवा संघ कार्यालयात बोलाविलेल्या पत्रकार परिषदेत सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या पदाधिकार्यांनी दिली. याप्रसंगी उत्सव समितीचे अध्यक्ष कृष्णाभाऊ अंधारे, सचिव अविनाश नाकट , डॉ.अभय पाटील, जगदीश पाटील मुरूमकार, संग्राम गावंडे, युवराज गावंडे, संदीप पाटील, राजेंद्र पातोडे,मनोज तायडे,सुषमा निचळ, मंदा देशमुख, प्रकाश तायडे, कपील रावदेव,प्रदीप वखारिया, अशोक पटोकार, पंकज साबळे, पंकज जायले,अविनाश देशमुख आणि पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.शिवजयंतीच्या निमित्ताने शिवाजी पार्क मधील आणि श्री. शिवाजी महाविद्यालायातील छत्रपतींच्या पुतळ्याचे सुशोभिकरण केले जाणार आहे. त्यासाठी गत महिन्याभरापासून विविध समित्या परिश्रम घेत आहेत. शिवजयंतीमध्ये विविध जाती, धर्म, पंथ, पक्ष आणि सामाजिक संघटनांना सहभागी करून घेण्याचा प्रयत्न समिती करीत आहे. अकोल्यातील शिवजयंती के वळ उत्सव समितीपुरता मर्यादीत न राहता ती प्रबोधनात्मक करण्याचा प्रयत्न आम्ही करीत असल्याचे याप्रसंगी पदाधिकार्यांनी सांगितले.
सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीची रविवारी अकोल्यात मोटारसायकल रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 3:19 PM
अकोला : सोमवारी दि.१९ फे ब्रुवारी रोजी होणाऱ्या शिवजयंतीसाठी अकोला नगरी सज्ज झाली असून त्यानिमित्ताने शहरात विविध कार्यकमांचे आयोजन करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे शिवजयंतीसाठी अकोला नगरी सज्ज झाली असून त्यानिमित्ताने शहरात विविध कार्यकमांचे आयोजन करण्यात आले आहे. जनजागृतीसाठी रविवारी शहरातून भव्य मिरवणूक काढली जाणार आहे.शिवाजी पार्क मधील आणि श्री. शिवाजी महाविद्यालायातील छत्रपतींच्या पुतळ्याचे सुशोभिकरण केले जाणार आहे.