अकाेला :अकाेट तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांचे माेठे नुकसान झाले असून त्यांना फळ पीक विम्याच्या दाव्याची रक्कम अत्यल्प मंजूर झाली आहे. ज्या विम्याचा प्रिमिअम आठ हजार आहे, त्या विम्यापाेटी केवळ हेक्टरी २६५ तर काहींना ५०० रूपये मंजूर झाल्याचा आराेप शेतकऱ्यांनी केला. विम्याचा दावा देतांना विमा प्रतिनिधीने भेदभाव केला तसेच शेतकऱ्यांशी त्यांची उध्दट वागणुक असल्याची तक्रार घेऊन साेमवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात शेकडो शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. त्यांनी तुटपुंज्या विम्याचे चेक जिल्हाधिकारी यांना परत केले असून विमा कंपनीच्या विराेधात राेष व्यक्त केला.
अकाेट तालुक्यातील पणज, अाकाेलखेड महसूल मंडाळातील केळी उत्पादक शेतकऱ्यांनी स्थानिक अशाेक वाटीकेपासून केळीचे खांब हातात घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाकडे माेर्चा काढला. जिल्हाधिकारी कार्यालयात माेर्चा आल्यानंतर पाेलीसांनी माेर्चा अडविला. त्यामुळे शेतकऱ्यांनी तिथेच ठिय्या मारला. रविकांत तुपकर , सतिष देशमुख आदीसह काही निवडक शेतकऱ्यांसाेबत जिल्हाधिकारी यांनी नियाेजन भवनात संवाद साधुन शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेतली. केळी उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी किमान ४५ हजार रुपये नुकसान भरपाई मिळणे अपेक्षित असताना तुटपुंजी रक्कम मंजूर झाल्याचा आराेप शेतकऱ्यांनी केला. फळ िपक िवम्याचा लाभ िमळण्यासाठी जिल्ह्यातील ६०० पेक्षा जास्त केळी उत्पादक शेतकऱ्यांनी िवमा काढला हाेता.मात्र विमा कपंनीने फसवणुक केली एकिकडे राज्य सरकार या नुकसान भरपाई पाेटी १८ हजार रुपये प्रती हेक्टरी मदत देत असताना िवमा कंपनीने शेतकऱ्यांची तुटपूंज्या रकमेवर बाेळवण केली असा आराेप यावेळी शेतकऱ्यांनी केला.
विमा प्रतिनिधी निलंबीत
केळी उत्पादक शेतकऱ्यांसाेबत उद्धट वागणुक करणारा व शेतकऱ्याना एफआयआरची धमकी देणारा विमा प्रतिनधी अखेर निलंबीत करण्यात आला. सपकाळ असे या प्रतिनिधींचे नाव असून विम्याचा दावा देतांना यांनी प्रचंड भेदभाव केल्याचे शेतकऱ्यांनी पुराव्यानिशी उघड केले या प्रतिनिधीवर कारवाई हाेणार नाही ताे पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय साेडणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली हाेती. त्याची दखल जिल्हाधिकारी यांना घ्यावीच लागली.
जिल्हाधिकारी कार्यालयातच साेडल्या शिदाेऱ्या
अकाेट तालुक्यातून सकाळीच मिळेल त्या वाहनाने शेतकरी अकाेल्यात दाखल झाले हाेते. पाणी व शिदाेरी असे साहित्य घेऊन आलेल्या शेतकऱ्यांंनी जिल्हाधिकारी कार्यालयातच शिदाेऱ्या साेडल्या. जाे पर्य्ंत न्याय मिळत् नाही ताे पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय न साेडण्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेतली हाेती.
शेतकऱ्यांचा प्रश्न लक्षात आला आहे या संदर्भात जिल्हा कृषी अधिक्षक यांना सूचीत केले असून येत्या आठवडययात हा प्रश्न मार्गी लागेल असा प्रयत्न केला जाईल.
- जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी अकाेला
मस्तवाल विमा प्रतिनिधीला शेतकऱ्यांच्या दबावापाेटी पदावरून हटविले आहे मात्र एवढयावर हे आंदाेलन संपले नाही जाे पर्यंत प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या हक्काचे पैसे मिळत् नाही ताे पर्यंत या प्रश्नाचा पाठपुरावा केला जाईल प्रसंगी पुन्हा आंदाेलन करू.
- रविकांत तुपकर, नेते स्वाभिमानी शेतकरी संघटना