शहरं
Join us  
Trending Stories
1
त्या घटनेच्या प्रतीला 'लाल' कव्हर, राहुल गांधींना अर्बन नक्षल्यांनी घेरलंय; फडणवीसांचा थेट हल्ला
2
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या प्रचार सभांचा धडाका; 'या' दिवशी पहिली सभा कोल्हापुरात
3
“लोकांची भावना तुतारीकडे…”; भाजपच्या सुरेश धस यांचं वक्तव्य: अजित पवारांवर साधला निशाणा!
4
दोन्ही उपमुख्यमंत्री निवडणूक रिंगणात; विठ्ठलाच्या महापूजेचा मान कोणाला मिळू शकतो? जाणून घ्या
5
फक्त २ 'परदेशी'; पंत, KL राहुल अन् श्रेयससह लिलावात सर्वाधिक मूळ किंमतीसह नाव नोंदणी करणारे खेळाडू
6
'स्विंग स्टेट्स' ठरवणार अमेरिकेचा नवा राष्ट्राध्यक्ष! ट्रम्प २० राज्यांत; कमला १० राज्यांत विजयी
7
'या' शेअरचं ट्रेडिंग बंद; कंपनीवर आहे प्रचंड कर्ज; ₹३४८ वरून ₹३४ वर आली किंमत
8
गोकुळचे माजी अध्यक्ष रवींद्र आपटे यांचे निधन; आज होणार अंत्यसंस्कार
9
अखेरची निवडणूक असल्याने माझा सन्मान राखावा; शहाजीबापू पाटलांचं जनतेला भावनिक आवाहन 
10
अल्लू अर्जुन आणि फहाद फासिल भिडणार! नवीन पोस्टर पाहून अंगावर येईल काटा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: मुंबईत आज इंडिया आघाडीची पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार
12
भाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई, राज्यातील ४० नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
13
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
14
कोण होणार अमेरिकेचा अध्यक्ष ट्रम्प की हॅरिस? 40 वर्षांत ज्यांची भविष्यवाणी कधी खोटी ठरली नाही त्यांनी सांगितलं
15
US Election Share Market : ट्रम्प यांच्या पुन्हा सत्तेत येण्याचे संकेत, भारतीय शेअर बाजारात तेजी; निफ्टी २४,३०० च्या वर
16
इस्रायलचा गाझामध्ये पुन्हा मोठा हल्ला! एअरस्ट्राइकमध्ये महिला-मुलांसह ३० जणांचा मृत्यू
17
सरकार 'या' कंपनीतील २.५ टक्के हिस्सा विकणार; ५०५ रुपये प्रति शेअर किंमत झाली निश्चित, जाणून घ्या
18
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'चं पहिलं पोस्टर समोर! सिनेमाचा सीक्वलही येणार, कधी प्रदर्शित होणार चित्रपट?
20
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ

खासदार कावड मार्गावर; पर्यायी सुविधा देण्याचे निर्देश; ‘डस्ट’ टाकून खडे हटविण्याची सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 12:55 PM

निर्माणाधीन रस्त्यावर उच्च प्रतीची ‘डस्ट’ टाकण्यासोबतच रस्त्याची झाडपूस करण्याचे निर्देश खासदार संजय धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाºयांना दिले.

ठळक मुद्दे पालखी उत्सवाच्या पृष्ठभूमीवर खा. संजय धोत्रे, आ. गोवर्धन शर्मा यांनी कावड मार्गाची पाहणी केली.काँक्रिटीकरणाच्या रस्त्यावर उच्च प्रतीची ‘डस्ट’टाका, रस्त्यावर मुरूमाचे बारीक खडे त्रासदायक ठरण्याची शक्यता. अभियंत्यांनी कामावर जातीने लक्ष ठेवण्याची सूचना खा. धोत्रे यांनी केली.

अकोला: श्रावणातील चौथ्या सोमवारी शहरात मोठ्या उत्साहात कावड व पालखी उत्सव पार पडणार आहे. अकोला ते गांधीग्राम ते अकोट मार्गाच्या दुरुस्तीचे कामकाज पाहता निर्माणाधीन रस्त्यावर उच्च प्रतीची ‘डस्ट’ टाकण्यासोबतच रस्त्याची झाडपूस करण्याचे निर्देश खासदार संजय धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाºयांना दिले. मंगळवारी खा. धोत्रे, आ. शर्मा, महानगराध्यक्ष किशोर मांगटे पाटील यांनी कावड मार्गाची पाहणी केली.श्रावण महिन्यात शहराचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वराला गांधीग्राम येथील पूर्णा नदीच्या पाण्याने जलाभिषेक करण्याची परंपरा मागील अनेक वर्षांपासून अविरत सुरू आहे. गांधीग्राम येथून शिवभक्त खांद्यावर कावड घेऊन १९ किलोमीटरचे अंतर पायी चालत शहरात प्रवेश करतात. त्यानंतर राजेश्वराला जलाभिषेक केला जातो. यंदा कावड मार्गाच्या दुरुस्तीचे काम सुरू असून, कंत्राटदाराच्या संथगतीमुळे रस्ता दुरुस्तीला विलंब झाला आहे. पालखी उत्सवाच्या पृष्ठभूमीवर खा. संजय धोत्रे, आ. गोवर्धन शर्मा यांनी कावड मार्गाची पाहणी केली. निर्माणाधीन काँक्रिटीकरणाच्या रस्त्यावर उच्च प्रतीची ‘डस्ट’टाका, रस्त्यावर मुरूमाचे बारीक खडे त्रासदायक ठरण्याची शक्यता पाहता झाडपूस सुरू ठेवा, रस्त्यालगत पथदिव्यांची तसेच वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश खा. धोत्रे यांनी ‘एनएचएआय’चे कार्यकारी अभियंता रावसाहेब झाल्टे यांना दिले. यावेळी मनपा स्थायी समिती सभापती विशाल इंगळे, नगरसेवक अजय शर्मा, विजय इंगळे, सतीश ढगे, विलास शेळके, सागर शेगोकार, हरिभाऊ काळे, प्रवीण जगताप, अमोल गोगे, संतोष डोंगरे, वैकुंठ ढोरे, रणजित खेडकर, गिरीश जोशी आदी उपस्थित होते.अपघातग्रस्त व्यक्तीला केले भरती!कावड मार्गाची पाहणी करून शहराकडे परत येत असताना खा. संजय धोत्रे यांना आगर येथील गणेश फाले यांचा रस्त्यावर अपघात झाल्याने ते जखमी अवस्थेत आढळून आले. गणेश फाले यांना तातडीने खासदार व आमदारांनी स्वत:च्या वाहनात बसवून थेट खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. ही प्रक्रिया झाल्यानंतर फाले यांच्या कुटुंबीयांना व शिवसेनेचे माजी जि.प. सदस्य हरिभाऊ भालतिलक यांना माहिती देण्यात आली.

दर्जाकडे लक्ष द्या!कावड-पालखी उत्सवाच्या सबबीखाली रस्त्याचे काम तातडीने पूर्ण केले जात असले तरी त्याच्या दर्जाबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे खा. धोत्रे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना स्पष्ट केले. त्यासाठी अभियंत्यांनी कामावर जातीने लक्ष ठेवण्याची सूचना खा. धोत्रे यांनी केली.

 

टॅग्स :AkolaअकोलाSanjay Dhotreसंजय धोत्रे