शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गात बदल; निवडणुकीसाठी काही रस्त्यांवर सहा दिवस नो पार्किंग!
2
"सरकार पाडण्यासाठी आमदारांना ५० कोटींची ऑफर...", मुख्यमंत्र्यांचा भाजपवर आरोप
3
आजचे राशीभविष्य - १४ नोव्हेंबर २०२४, सगळ्या कामात यश मिळाल्याने खूप आनंदी आणि प्रसन्न व्हाल
4
आजचा अग्रलेख: 'बुलडोझर'ला ब्रेक...
5
धक्कादायक! जळगावात गरोदर महिलेला घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्समध्ये ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट; १५० फूट उंच उडाल्या चिंधड्या
6
शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा?; १७ नोव्हेंबरला सभेसाठी मनसेला मंजुरी मिळण्याची शक्यता
7
मुंबईत प्लास्टिकच्या डब्यात तुकडे करून टाकलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; प्रेमसंबंधाच्या विरोधातून हत्या!
8
नागपुरात कार्यकर्तेच बनले फडणवीसांच्या प्रचार मोहिमेचे सारथी
9
मार्कोची फास्टर फिफ्टी; पण शेवटी सूर्याची सेना जिंकली! आता फक्त टीम इंडियालाच मालिका विजयाची संधी
10
"आत टाका म्हणजे पक्षात टाका हे लोकांना कळलंच नाही"; ईडी कारवायांवरुन राज ठाकरेंची मिश्किल टिप्पणी
11
IND vs SA : विक्रमी धावसंख्येसह टीम इंडियाच्या नावे झाला सर्वाधिक शतकांचा खास रेकॉर्ड
12
"रोज उठतात अन्..."; ओ मोठ्या ताई, महासंसद रत्न, कुठलं बी टाकलं होतं? म्हणत चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
13
केंद्र सरकारनं मणिपूरमध्ये रातोरात पाठले 2000 CAPF जवान, आता कशी आहे जिरीबाम मधील स्थिती?
14
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! हंगामाच्या सुरुवातीलाच धानाला विक्रमी दर, केंद्र सरकारने 'ड्युटी' रद्द केल्याचा परिणाम
15
गौतम अदानी यांची मोठी घोषणा; अमेरिकेत करणार तब्बल ₹ 84 हजार कोटींची गुंतवणूक...
16
अन्... योगी आदित्यनाथांची सभाच रद्द झाली; भाईंदरचे भाषण ऐकविण्याचा प्रयत्न, नागरिक ३ तास ताटकळले
17
"पहिलं बटण दाबा, बाकीची खराब आहेत"; शिंदे गटाच्या कार्यकर्त्याकडून EVM बाबत चुकीचा प्रचार
18
सलग २ सेंच्युरीनंतर भोपळ्यावर भोपळा! Sanju Samson च्या नावे झाला लाजिरवाणा रेकॉर्ड
19
साहेब रिटायर झाल्यानंतर तुमच्याकडे कोण बघणार? अजित पवार म्हणाले,"मलाच आता..."
20
बाप डोक्यावर आणि मुले खांद्यावर घेऊन जगायची वेळ येईल...; उद्धव ठाकरेंची राणे पिता-पुत्रांवर टीका 

दाेन कुख्यात गुंडांना ‘एमपीडीए’चा दणका, पाेलिस यंत्रणा ‘ॲक्शन माेड’वर

By आशीष गावंडे | Published: October 10, 2024 7:55 PM

Akola News: समाजात धाकदपट,हाणामारी व बळाचा वापर करुन अशांतता निर्माण करणाऱ्या कुख्यात गुंडांना वठणीवर आणन्यासाठी जिल्हा पाेलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी ‘एमपीडीए’अंतर्गत कारवाइचे हत्यार उपसले आहे.

- आशिष गावंडेअकाेला -  समाजात धाकदपट,हाणामारी व बळाचा वापर करुन अशांतता निर्माण करणाऱ्या कुख्यात गुंडांना वठणीवर आणन्यासाठी जिल्हा पाेलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी ‘एमपीडीए’अंतर्गत कारवाइचे हत्यार उपसले आहे. शिवसेना वसाहतमधील लाेकमान्य नगर व गायगाव येथील अट्टल अशा दाेन गुन्हेेगारांवर एक वर्षांच्या कालावधीसाठी कारागृहात स्थानबध्दतेची कारवाइ करण्यात आली आहे. आगामी सणासुदीचे दिवस लक्षात घेता पाेलिस यंत्रणा ‘अॅक्शन माेड’वर आल्याचे दिसत आहे. 

संदीप उत्तमराव पाचपाेर (३० रा.शिवसेना वसाहत लाेकमान्य नगर अकाेला) व अक्षय प्रकाश आगरकर (२५ रा. गायगाव ता.बाळापूर जि.अकाेला) अशी स्थानबध्द करण्यात आलेल्या कुख्यात आराेपींची नावे आहेत. उपराेक्त दाेन्ही आराेपींविराेधात जबरी चोरी करणे, दुखापत करणे, अश्लील कृती करणे, शांतताभंग करणे, धाकदपट करणे, घातक हत्यारांनी इजा करणे, हद्द‌पार आदेशाचे उल्लंघन करणे, बेकादेशीररित्या शस्त्र बाळगणे यांसह अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. यातील संदीप पाचपाेर याच्याविराेधात घरात घुसून महिलांचा विनयभंग करणे, पाठलाग करुन महिलांचा लैगिंक छळ करण्याचेही गुन्हे दाखल आहेत. यासर्व बाबी लक्षात घेता जिल्हा पाेलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी कुख्यात गुंड अक्षय आगरकर व संदिप पाचपोर याच्याविराेधात स्थानबध्दतेची कारवाइ जिल्हाप्रशासनाकडे प्रस्तावित केली हाेती. या प्रस्तावाला जिल्हाप्रशासनाने ९ ऑक्टाेबर राेजी मंजूरी दिली.   यांनी तयार केले प्रस्तावउपराेक्त कुख्यात गुंडांविराेधात बाळापूर येथील उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन पडघन, ‘एलसीबी’ प्रमुख शंकर शेळके, ‘पीएसआय’ माजिद पठाण, अंमलदार ज्ञानेश्वर सैरिसे, उदय शुक्ला, जुने शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक नितीन लेव्हरकर, ‘पीएसआय’रविंद्र करणकर तसेच उरळ पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक गोपाल ढोले, ‘पीएसआय’ गणेश कायंदे, विजयसिंग झाकर्डे, गणेश खुपसे यांच्यासह पाेलिस कर्मचाऱ्यांनी स्थानबध्दतेचा प्रस्ताव तयार केला हाेता.  कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी गुंडगिरी खपवून घेणार नाही. त्यासाठी पाेलिस यंत्रणेला कुख्यात गुंड, गावगुंडांची इत्थंभूत माहिती सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. शाळकरी विद्यार्थीनी, तरुणी, महिलांसह सर्वसामान्य नागरिकांना त्रास असल्यास त्यांनी ११२ क्रमांकावर संपर्क साधावा.-बच्चन सिंह, जिल्हा पाेलिस अधीक्षक

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAkolaअकोला