अकोला : दहा राज्यांना जोडणाºया अकोला ते खंडावा लोहमार्गाच्या अकोला ते अकोट टप्प्याच्या ब्रॉडगेज परिवर्तनाचे काम सुरु आहे. अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांनी शुक्रवारी या कामाची पाहणी करून समाधान व्यक्त केले.खासदार धोत्रे यांनी अकोला दक्षिण मध्य रेल्वे स्थानक पासून २२ किलोमीटर च्या रेल्वे मार्गाची पाहणी केली. यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली. ग्रामस्थांच्या सूचनांची दखल घ्यावी अशा सूचना अधिकाºयांना दिल्या. या वेळी दक्षिण मध्य रेल्वेचे कार्यकारी अभियंता नारायण श्रीवास्तव आणि दक्षिण मध्य रेल्वेचे विभागीय अभियंता आशुतोष यादव उपस्थित होते. यावेळी पाहणी करण्यासाठी खासदार संजय धोत्रे यांच्यासोबत आमदार रणधीर सावरकर, तेजराव थोरात, किशोर मांगटे पाटील, उपमहापौर वैशाली शेळके , विलास शेळके ,बाळ टाले, विवेक भरणे, अनिल गावंडे, गजानन लोणकर, राहुल देशमुख, चंदा शर्मा, गीतांजली शेगोकार, वसंत बाछुका, अॅड. सुभाषसिंग ठाकूर, नंदा पाटील, सारिका जैस्वाल, योगिता पावसाळे, टोलू जैस्वाल, बबलू पळसपगार, हरीश अमानकर, संतोष वाकोडे, गिरीश देशमुख, वसंता मानकर, डॉ. संजय शर्मा, रणजित खेडकर, हरिभाऊ काळे, रमेश अप्पा कपरे, अभिजित बांगर आदी यावेळी उपस्थित होते.
खासदारांनी केली अकोला-खांडवा लोहमार्ग गेज परिवर्तन कामाची पाहणी
By atul.jaiswal | Published: February 03, 2018 2:03 PM
अकोला : दहा राज्यांना जोडणाºया अकोला ते खंडावा लोहमार्गाच्या अकोला ते अकोट टप्प्याच्या ब्रॉडगेज परिवर्तनाचे काम सुरु आहे. अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांनी शुक्रवारी या कामाची पाहणी करून समाधान व्यक्त केले.
ठळक मुद्देखासदार धोत्रे यांनी अकोला दक्षिण मध्य रेल्वे स्थानक पासून २२ किलोमीटर च्या रेल्वे मार्गाची पाहणी केली.ग्रामस्थांच्या सूचनांची दखल घ्यावी अशा सूचना अधिकाºयांना दिल्या. दक्षिण मध्य रेल्वेचे कार्यकारी अभियंता नारायण श्रीवास्तव आणि दक्षिण मध्य रेल्वेचे विभागीय अभियंता आशुतोष यादव उपस्थित होते.