बुलडाणा, दि. ३0: समाज कल्याण सचिवाच्या दालनात शिवसेनेचे खासदार व आमदारांनी सोमवारी सायंकाळी पाच तास ठिय्या आंदोलन केले. समाज कल्याण सचिव सुरेंद्र बागडे यांच्याकडे आ. संजय रायमुलकर यांनी माहि तीच्या अधिकारांतर्गत माहिती मागितली होती; मात्र दोन महिने झाल्यावरही त्यांनी माहिती दिली नाही. त्यामुळे त्यांच्या दालनात खा. प्रतापराव जाधव, सिंदखेडराजाचे आ. शशिकांत खेडेकर, मेहकरचे आ. संजय रायमुलकर यांनी समाज कल्याण सचिवांच्या दालनात एक-दोन नाही तर तब्बल पाच तास ठिय्या आंदोलन केले. आ. डॉ. संजय रायमुलकर यांनी मेहकर तालुक्यातील अधिकार्याच्या जात पडताळणीच्या समितीची माहिती ३0 जून २0१६ रोजी मागि तली होती. यामध्ये अधिकार्याला चुकीच्या पद्धतीने बढती देण्यात आली असून, पुनर्नियुक्ती त्याच पदावर देण्यात आली काय? याबाबत माहिती विचारण्यात आली होती; परंतु गत दोन महिने माहितीच्या अधिकारात माहिती मागूनसुद्धा माहिती का देण्यात आली नाही. त्यानंतर आ. रायमुलकर व आ. खेडेकर माहिती मागण्याकरिता गेले असता, त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. त्यामुळे खा. प्रतापराव जाधव, आ. शशिकांत खेडेकर व आ. संजय रायमुलकर यांनी ठिय्या दिला. अखेरीस रात्री ९ वाजता माहिती देण्यात आली. त्यानंतरच आमदारांनी सचिवांचे कार्यालय सोडले.
खासदारांसह आमदारांचा मंत्रालयात ठिय्या!
By admin | Published: August 31, 2016 1:28 AM