शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

मृत्युंजय शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 1:44 AM

२00१ मध्ये भारतातील आगमनाप्रसंगी ज्यांना जागतिक नेत्यांच्या आगमनासारखी प्रसिद्धी लाभली, ज्यांच्या १५ दिवसांच्या भारत भेटीत प्रत्यक्ष राष्ट्रपतींनी त्यांची आवर्जून भेट घेतली आणि वयाच्या २६ व्या वर्षांपासून ‘व्हिलचेअर’वर खिळूनही  ज्यांनी दुर्दम्य उत्साहाने  ‘नासा’च्या सौजन्याने शून्य गुरुत्वाकर्षणाचा अनुभव घेतला! अशी ही जिवंतपणी दंतकथा बनलेली व्यक्ती १४ मार्च रोजी वयाच्या ७६ व्या वर्षी काळाच्या पडद्याआड गेली. पुढील आठवडाभर त्यांच्याबद्दल मोठमोठे लेख प्रसिद्ध होतील; पण मी आज लिहिणार आहे, त्या स्टीफनबद्दल जोे जगप्रसिद्ध नव्हता, ज्याला देवत्व प्राप्त झालेलं नव्हतं! तो तुमच्या आमच्यासारखा होता. - डॉ. नितीन ओक

स्टीफन हॉकिंग...एक अशी व्यक्ती, जिचा जन्म ८ जानेवारी १९४२ रोजी, म्हणजे गॅलिलिओ गॅलिली यांच्या मृत्युनंतर बरोबर ३00 वर्षांनी झाला होता, ज्यांचे ‘ब्रीफ हिस्ट्री आॅफ टाइम ’ हे पुस्तक एक-दोन नव्हे, तर तब्बल २५७ आठवडे ‘बेस्ट सेलर’ राहिले, ज्यांनी ‘जनरल थिअरी आॅफ रिलेटिव्हिटी’ आणि ‘क्वांटम थिअरी’ या दोघांची सांगड घालून, कृष्णविवराची यशस्वी मांडणी केली, २00१ मध्ये भारतातील आगमनाप्रसंगी ज्यांना जागतिक नेत्यांच्या आगमनासारखी प्रसिद्धी लाभली, ज्यांच्या १५ दिवसांच्या भारत भेटीत प्रत्यक्ष राष्ट्रपतींनी त्यांची आवर्जून भेट घेतली आणि वयाच्या २६ व्या वर्षांपासून ‘व्हिलचेअर’वर खिळूनही  ज्यांनी दुर्दम्य उत्साहाने  ‘नासा’च्या सौजन्याने शून्य गुरुत्वाकर्षणाचा अनुभव घेतला! अशी ही जिवंतपणी दंतकथा बनलेली व्यक्ती १४ मार्च रोजी वयाच्या ७६ व्या वर्षी काळाच्या पडद्याआड गेली. पुढील आठवडाभर त्यांच्याबद्दल मोठमोठे लेख प्रसिद्ध होतील; पण मी आज लिहिणार आहे, त्या स्टीफनबद्दल जोे जगप्रसिद्ध नव्हता, ज्याला देवत्व प्राप्त झालेलं नव्हतं! तो तुमच्या आमच्यासारखा होता. अशा त्या सामान्य स्टीफनचं असामान्यत्व कुठेतरी आम्हाला आधार देईल, उभारी देईल, आमच्या पंखात बळ देईल! इंग्लंडमधल्या आॅक्सफोर्ड गावात फ्रँक आणि ईसाबेल या दाम्पत्याला हे अपत्य झालं. नाव ठेवलं स्टीफन. नंतर फिलिपा आणि मेरी या बहिणी जन्मल्या. स्टीफनला एक भाऊदेखील होता. तो फ्रँक आणि ईसाबेल या दाम्पत्याने दत्तक घेतला होता. त्याचे नाव एडवर्ड. या सगळ्या घडामोडी दुसºया महायुद्धाच्या दरम्यानच्या होत्या. युद्ध संपल्यावर स्टीफनचे वडील ‘नॅशनल इंस्टीट्यूट फॉर मेडिकल रिसर्च’ेमध्ये विभाग प्रमुख झाले. पुढे हे कुटुंब सेंट अल्बान्स या गावात स्थायिक झालं. त्या भागात हे कुटुंब कुशाग्र बुद्धीचं; मात्र थोडं विचित्र समजल्या जायचं. त्यांच्या अस्ताव्यस्त घरात प्रत्येक जण शांतपणे पुस्तक वाचतानाच दिसायचा. इंग्लंडमध्ये १९४४ पासून पुढील शिक्षणाच्या निवडीसाठी ‘एलेव्हन प्लस’ नावाची परीक्षा असते. स्टीफनने ती एक वर्ष आधीच उत्तीर्ण केली; पण वेस्टमिनीस्टर शाळेसाठी असलेली शिष्यवृत्ती न मिळाल्याने त्याचे पुढील शिक्षण सेंट अल्बान्समध्येच सुरू झालं. स्टीफनने लहानपणी शिक्षकांच्या (डिक्रान ताहता) मदतीने घडाळ्याचे घटक, टेलिफोनचा स्वीचबोर्ड आणि काही भंगार साहित्य वापरुन संगणक तयार केला. त्याला त्या छोट्या भागात सगळे आईन्स्टाइनच म्हणत. स्टीफनचे वडील त्याला वैद्यकीय शाखेकडे जायला सांगत होते, तर ताहता सरांचा प्रभाव त्याला गणिताकडे ओढत होता. युनिव्हर्सिटी कॉलेज आॅक्सफोर्डला १७ व्या वर्षी स्टीफनचं शिक्षण सुरू झालं. पाहता-पाहता स्टीफन उत्स्फूर्त, दिलफेक, धाडसी आणि बराचसा आगाऊ विद्यार्थी म्हणून ओळखल्या जाऊ लागला. त्याला केंब्रीज विद्यापीठात कॉस्मॉलॉजी शिकण्यासाठी फर्स्ट क्लास आॅनर्स आवश्यक होतं. आपल्यापैकी बहुतेकांप्रमाणे स्टीफनने परीक्षेच्या आदल्या रात्री फक्त २-३ तास झोपून परीक्षा दिली आणि तो जेमतेम काठावर उत्तीर्ण झाला. आता स्टीफनला हव्या त्या  अभ्यासक्रमाला प्रवेश मिळविण्यासाठी व्हायव्हा म्हणजे तोंडी परीक्षा देणं आवश्यक होतं आणि त्या तोंडी परीक्षेत स्टीफन सरांना चक्क सांगता झाला, ‘‘जर तुम्ही मला फर्स्ट क्लास दिला नाही, तर मी केंब्रीजला जाण्याऐवजी इथेच राहील. मग...’’ परीक्षा घेणारे स्टीफनच्या बुद्धीमत्तेला आणि आगाऊपणाला चांगले ओळखत होते, त्यांनी क्लास दिला आणि स्टिफन केंब्रीजमध्ये दाखल झाला. तिथे त्याला पहिल्या पराभवाचा सामना करावा लागला. तो म्हणजे सुपरव्हायजर म्हणून प्रसिद्ध फ्रेड हॉयलऐवजी डेनिस स्कायमा मिळाले. ते शिकवित असलेले  गणित, जनरल रिलेटिव्हिटी आणि कॉस्मॉलॉजीला गवसणी घालायला कमी पडत  होते. त्यात भर पडली एका वज्राघाताची! स्टीफनला ‘मोटार न्यूरॉन डीसिस’ झाल्याचे निदान झाले. हा आजार लाऊ गेहरिंग डीसिस,  ‘आईस बकेट डीसिस’ या नावांनीदेखील ओळखला जातो. या आजारात आपले प्रतिक्षिप्त स्रायू दुबळे होत जातात. वाचा जाते, अन्न गिळता येत नाही आणि शेवटी श्वास घेता न आल्याने रुग्ण गुदमरुन मरतो. स्टीफनला हे ऐकताच जबर धक्का बसला. नुकतंच त्याचं आणि जेन (जेन बेर्ली वाईल्ड) या भाषाशास्त्र शिकणाºया विद्यार्थिनीचं  प्रेम प्रकरण सुरू झालं होतं आणि हे माझ्यासोबतच का, या विचाराने तुमचा आमचा होतो, तसाच स्टीफनचा पण ‘नर्व्हस बे्रकडाऊन’ झाला. त्याची पे्रयसी आणि त्याचे शिक्षक त्याला समजावत होते आणि १९६३ मध्ये आजाराबद्दल समजूनदेखील १९६४ मध्ये जेन आणि स्टीफनच्या संसाराला सुरुवात झाली. लग्नाच्या  वेळीच स्टीफन नीट चालू शकत नव्हता. पुढे १९६७ मध्ये रॉबर्टचा, १९७० मध्ये लुसीचा आणि १९७९ मध्ये टिमोथीचा जन्म झाला. वैद्यकशास्त्राने १९६५-६६ पर्यंत स्टीफनचं आयुष्य संपेल, असं सागितलं होतं; पण अभ्यासात गुंतवून घेतल्याने, लग्नामुळे जगण्याचं कारण सापडल्याने (आम्ही लग्न म्हणजे जबाबदारी समजतो) आणि जेननी सांसरिक जबाबदाºया समर्थपणे पेलल्याने, स्टीफन पेनरोज या गणितज्ज्ञाच्या मदतीने विश्वाचं रहस्य उलगडता झाला. त्याने ‘बिग बँग थिअरी’च्या उगमासाठी दिलेल्या गणिताने, फे्रड हॉअ‍ेल आणि त्यांचे शिष्य जयंत नारळीकर यांची ‘स्टडी स्टेट थिअरी’ उधळून लावली. स्टीफन हॉकिंग यांनी कृष्णविवराची कल्पना मांडली. (तसा हा शोध आमच्या चंद्रशेखर यांच्या शोधावर आधारित होता.) त्यानंतर स्टीफनला जी प्रसिद्धी मिळाली, ती त्याआधी फक्त अल्बर्ट आईन्स्टाइनलाच मिळाली होती!स्टीफन हॉकिंग जेवढे बुद्धीमान, तेवढेच खिलाडू वृत्तीचे होते. याचा पुरावा ते आणि हिग्ज यांच्या वादात दिसतो. हिग्जनी २००२ साली ‘हिग्ज-बोसॉन’ कणांची  शक्यता गणिताने सिद्ध केली; पण स्टीफन यांनी ‘बेट’ मारली, की हे कण कधीच सापडणार नाहीत. त्यावर  हिग्ज यांनी २००८ मध्ये जाहीर विधान केलं, की स्टीफन प्रसिद्धीच्या झोतात असल्याने लोकं त्यावर विश्वास ठेवतात, इतराना तो फायदा मिळत नाही. पुढे २०१२ मध्ये ‘सर्न’ येथे ‘हिग्ज-बोसॉन’ कण सापडला, तेव्हा हा जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ सांगता झाला, ‘‘मी स्टीफन हॉकिंग हरलो, बहुदा आता हिग्जला नोबल मिळायला हवं.’’ पुढच्याच वर्षी तसं झालं. मला व्यक्तिगत पातळीवर जरी स्टीफन हॉकिंग एक योद्धा म्हणून आवडत असले, तरी त्यांचं स्पष्ट मत होतं की, त्यांची पहिली ओळख शास्त्रज्ञ म्हणून, प्रसिद्ध विज्ञान लेखक नंतर आणि एक सर्वसामान्य समान इच्छा, समान प्रेरणा, सर्वमान्य स्वप्न आणि सर्वांसारख्या अपेक्षा असणारा एक माणूस म्हणून असावी.’’ ही सामान्य म्हणवून घेणारी असामान्य व्यक्ती १४ मार्चच्या पहाटे आमच्यासारख्या सामान्य व्यक्तीमध्ये असामान्यतेचे बीज रोवून अनंताच्या प्रवासास निघाली. 

- डॉ. नितीन ओक(लेखक  २००१ मध्ये मध्ये टीआयएफआरमध्ये झालेल्या ‘स्ट्राँग २००१’ या आंतरराष्ट्रीय संमेलनाला उपस्थित होते. त्यावेळी स्टीफन हॉकिंगचे भाषण ऐकण्याची संधी त्यांना लाभली होती. त्याच संस्थेत संशोधन करताना त्यांना चंद्रशेखर यांना ऐकता आले आणि जयंत नारळीकरांच्या संस्थेत सुमारे दोन महिन्याच्या कार्यशाळेदरम्यान त्यांनी नारळीकरांनाही बºयाचदा ऐकले. त्या सगळ्या आठवणी हा लेख लिहिताना उचंबळून आल्या होत्या.)