अकोट : लोकमत रक्ताचं नातं या उपक्रमात महावितरणच्या महाराष्ट्र स्वाभिमानी विद्युत वर्कर्स युनियनने सक्रिय सहभाग घेत महावितरणने लोकमतशी रक्ताचं नातं जोडलं. अकोट येथील संत गजानन महाराज मंदिर सभागृहात ११ जुलै रोजी ४१ जणांनी रक्तदान केले. अकोट शहरातील पार पडलेल्या तिसऱ्या रक्तदान शिबिरात चांगला प्रतिसाद रक्तदात्यांनी नोंदवला.
रक्तदान शिबिराचे उद्घाटन प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांचे हस्ते करण्यात आले. याप्रसंगी काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल, सहकार नेते रमेश हिंगणकर, प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे, माजी नगराध्यक्ष पुरुषोत्तम चौखंडे, माजी नगराध्यक्ष संजय बोडखे, प्राचार्य अतुल म्हैसने, शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे, शिवसेनेचे गटनेता मनीष कराळे, नायब तहसीलदार हरीश गुरव, ग्रामीण ठाणेदार ज्ञानोबा फड, विद्युत वर्कर्स युनियन सरचिटणीस राजेश कठाळे, उपकार्यकारी अभियंता गोपाल अग्रवाल, डॉ. राजेश नागमते, डॉ. गजानन महल्ले, विद्युत वर्कर्स युनियनचे योगेश वाकोडे, ‘लोकमत’चे तालुका प्रतिनिधी विजय शिंदे, संजय जयस्वाल, प्रमोद लोडम, रजाअली, किशोर खोले महाराज यांची उपस्थिती होती.
रक्तदानासाठी शासकीय जिल्हा रुग्णालयातील रक्त संक्रमण अधिकारी प्रणय वाकोडे, सचिन डांगटे, सतीश उकिर्डे, अंकुश जगधाडे, शिल्पा तायडे, संतोष सिरसाट, रूपेश तायडे, नीलेश भावनाकरे, प्राची होलकर, निकिता सरनाईक यांनी रक्त संकलन केले. याप्रसंगी अनिल गावंडे यांची प्रहार जनशक्ती पक्ष प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्यपाल महाराजांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. रक्तदान शिबिरात रक्तदात्यांना प्रमुख अतिथींच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. कार्यक्रमाला सहकार्य करणारे योगेश वाकोडे, विराट ग्रुपचे विशाल भगत, मानव समाज संघटनेचे विजय जितकर नंदकिशोर शेगोकार, पत्रकार लकी इंगळे, विनोद कोनप्ते, अक्षय जायले, आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक धीरज कळसाईत यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी रक्तदानप्रसंगी मार्गदर्शन केले. शिबिरात देशभक्तीपर गीत गायन करीत हरीश ढवळे, आदर्श अग्रवाल, महेंद्र सोनोने, श्रीकांत ढवळे यांनी उत्साह वाढविला. यशस्वितेसाठी विद्युत वर्कर्स युनियनचे किरण पवार, सचिन टवले, प्रशांत मोहोकार, सचिन चिंचोळकार, साजीद अली, अमोल घाटोळ, एम. आर. खान, मनीष डाबरे, दीपक हेंड, नरेंद्र देशमुख, संजय रेळे, संदीप देशमुख, गोपाल केदार, मोहन हिरपूरकर, अक्षय उकडकार, सुरज शेडोंकार, श्रीकांत तळोकार यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन हरीश ढवळे, आभार योगेश वाकोडे यांनी मानले.
चौकट...
उपक्रमात सहभागी कर्मचाऱ्यांचा मोफत विमा!
लोकमत रक्ताचं नातं या उपक्रमात सहभागी झालेल्या अकोट येथील महावितरणच्या महाराष्ट्र स्वाभिमानी विद्युत वर्कर्स युनियनचे जे कर्मचारी विद्युत खांबावर काम करतात, अशा सर्व कर्मचाऱ्यांचा प्रत्येकी दोन लाखांचा विमा तात्काळ काढण्यात येणार असल्याचे रघुनंदन अर्बन मल्टीपर्पज निधी लिमिटेडचे चेअरमन तथा माजी नगराध्यक्ष पुरुषोत्तम चौखंडे यांनी जाहीर केले.