निहिदा : पिंजर येथील उपकेंद्रांचा कारभार ढेपाळल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. परिसरात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असून, याकडे संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच महावितरणच्या वरिष्ठांनी दखल घेऊन पिंजर येथे मंगळवारी भेट दिली. कार्यकरी अभियंता विजयकुमार कासट, उप कार्यकरी अभियंता उंबरकर यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी लवकरच समस्या सोडविण्यात येतील, असे आश्वासन कार्यकारी अभियंत्यांनी दिले.
पिंजर येथील उपकेंद्रांतर्गत विद्युत रोहित्रांची दुरवस्था झाली असून, वीज वितरणाच्या समस्या वाढल्या आहेत. तसेच परिसरातील गावात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिक वैतागले आहेत. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच महावितरणचे कार्यकारी अभियंता विजयकुमार कासट यांनी भेट देऊन सर्व समस्या जाणून घेतल्या. यावेळी गावागावात सर्व्हे करून समस्या मार्गी लावण्यात येतील, असे आश्वासन देण्यात आले. दरम्यान, कर्मचाऱ्यांनी कामाला सुरुवात देखील केली होती. येत्या दोन दिवसांत समस्या मार्गी लावून अहवाल सादर करण्याचा आदेश कार्यकारी अभियंत्यांनी पिंजर येथील कर्मचाऱ्यांना दिले. यावेळी उपकार्यकारी अभियंता, पिंजरचे हेड लाईनमन देवीदास जाधव, प्रधान तंत्रज्ञ सचिन डाबेराव, धीरज खापर्डे, जवके, डिंगाबर उजाळे आदी कर्मचारी उपस्थित होते. (फोटो)