अकोला : वीज देयकासाठी कागदाचा वापर पूर्णपणे बंद करून ते ‘ई-मेल’द्वारे देण्याच्या महावितरणच्या 'गो-ग्रीन' या पर्यावरणपुरक योजनेत आतापर्यंत राज्यातील एक लाखांपेक्षा अधिक पर्यावरणस्नेही ग्राहकांनी सहभाग नोंदविला आहे. यामध्ये अकोला परिमंडळातील सुमारे चार हजार वीजग्राहकांचा समावेश आहेमहावितरणकडून 'गो-ग्रीन' योजनेत छापील वीजबिलाच्या कागदाऐवजी फक्त 'ई-मेल'चा पर्याय निवडल्यास वीजग्राहकांना प्रति बिल १० रुपये सवलत देण्यात येत आहे. त्यामुळे वीजग्राहकांची वार्षिक १२० रुपयांची बचत होणार आहे. याशिवाय वीजबिल 'ई-मेल' तसेच 'एसएमएस'द्वारे दरमहा मिळणार असल्याने ते लगेचच प्रॉम्ट पेमेंटसह आॅनलाईनद्वारे भरण्याची सोय उपलब्ध होत आहे. तसेच वीजग्राहकांना छापील वीजबिलांची गरज भासल्यास त्यांना ईमेलद्वारे प्राप्त झालेले दरमहा वीजबिल संगणकात सॉफ्ट कॉपीमध्ये जतन करून ठेवण्याची सोय आहे. यासोबतच महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळावर वीजबिल मूळ स्वरुपात उपलब्ध असून ते डाऊनलोड किंवा प्रिंट करण्याची सोय आहे.महावितरणमध्ये आतापर्यंत १ लाख ३ हजार ९१८ वीजग्राहकांनी 'गो-ग्रीन' योजनेत सहभाग नोंदविला आहे. यामध्ये पुणे प्रादेशिक विभागातील् ा४००६९ ग्राहकांची संख्या राज्यात सर्वाधिक आहे. त्यानंतर कोकण प्रादेशिक - ३७८००, नागपूर प्रादेशिक विभाग - १३७१७ आणि औरंगाबाद प्रादेशिक विभागातील १२३३२ वीजग्राहकांचा समावेश आहे. 'गो-ग्रीन'चा पर्याय निवडण्यासाठी वीजग्राहकांनी वीजबिलावरील गो-ग्रीन क्रमांकाची नोंदणी महावितरणच्या मोबाईल अॅपद्वारे किंवा महावितरणच्या संकेतस्थळा वर उपलब्ध आहे. वीजग्राहकांनी महावितरणच्या गो-ग्रीन योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा व पर्यावरणपुरक योजनेमध्ये योगदान द्यावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.परिमंडळनिहाय गोषवारापरिमंडळ पर्यावरणस्रेही ग्राहकअकोला - ३९३९अमरावती - २९२७पुणे - २४९७५बारामती - ८३३०कोल्हापूर - ६७६४नागपूर - ४२४९गोंदीया- १२८८चंद्रपूर - १४१४नाशिक - १०५८३कोकण- २१६१कल्याण- १०१३२जळगाव - ५३९४भांडूप - ९५३०औरंगाबाद - ५३१०लातूर- ४०३५नांदेड - २९८७