अकोला : वीज देयकाची थकबाकी असलेल्या ग्राहकांविरुठ कठोर पावले उचलत महावितरणने चालू महिन्यात अकोला परिमंडळाअंतर्गत अकोला, बुलडाणा व वाशिम या तीन जिल्ह्यातील पाच हजार १९७ ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित केला आहे. ही कारवाई पुढील काळात आणखी तीव्र करण्यात येणार असल्याने थकबाकीदार ग्राहकांना यापुढे अंधारात राहावे लागणार असल्याचे स्पष्ट संकेत महावितरणने दिले आहेत.वापरलेल्या विजेचे बिल ग्राहकांनी वेळेवर भरने अपेक्षीत असते. पण तसे न होता काही ग्राहक वीज देयकाचे पैसेच भरत नसल्याने परिमंडळातील फक्त घरगुती , औद्योगीक आणि वाणिज्यिक ग्राहकाची थकबाकी ही ९३ कोटीच्या घरात गेली आहे. या थकबाकीचा फटका ग्राहक सुविधेला बसत आहे . कारण महावितरणच्या कर्मचाऱ्यांना वसूलीसाठी जावे लागत असल्याने वीज यंत्रणेची देखभाल दुरूस्ती करणे , नविन वीज जोडणी देणे , ग्राहकांच्या तक्रारींचे वेळेत निराकरण करणे महावितरण कर्मचाऱ्यांना शक्य होत नाही.त्यामुळे यापुढे ‘बिल नाही तर वीज नाही’ ही एकमेव मोहीम महावितरण अकोला परिमंडळाकडून राबविण्यात येणार असून या मोहीमेत थकबाकीदार ग्राहकांचा अंधारात जावे लागणार आहे. आता पर्यंत वीज पुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांमध्ये अकोला जिल्हयातील १७६१ , बुलढाणा जिल्हयातील १७७० आणि वाशिम जिल्हयातील १६६६ ग्राहकांचा समावेश आहे.खंडीत ग्राहकांची फेरतपासणी होणारज्या ग्राहकांचा महावितरणने थकबाकीमुळे वीज पुरवठा खंडित केला आहे. त्या ग्राहकांची आकस्मिक फेर तपासणीही करण्यात येणार आहे . या फेरतपासणी दरम्याण जर ग्राहक वीज चोरी करत असल्याचे आढळल्यास किंवा शेजारील घरातून वीज घेत असल्याचे आढळल्यास वीज चोरी करणाºयावर व अनाधिकृत विजेचा पुरवठा करणाºया अशा दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
अकोला परिमंडळातील थकबाकीदार ५ हजार १९७ ग्राहकांचा वीज पुरवठा खंडीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 3:19 PM