लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : मुगाचे वाढलेले दर एकाच दिवशी कमी झाले. आता कुठे नवीन मुगाची आवक सुरू होत असताना हे भाव कमी झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.गत काही दिवसांपासून मुगाच्या दरात चढ-उतार सुरू आहे. तथापि, २८ आॅगस्ट रोजी अचानक मुगाच्या भावात वाढ होत जास्तीचे प्रतिक्ंवटल दर ६,५०१ रुपयांवर तर सरासरी भाव हे ५,६०० रुपयांवर पोहोचले होते; परंतु २९ आॅगस्ट रोजी वेगाने हे वाढलेले भाव कोसळत प्रतिक्ंिवटल सरासरी ४,९०० तर जास्तीचे भाव हे ५ हजार रुपयांवर खाली आले. अकोला कृषी उत्पन्न बाजारात समितीमध्ये २९ आॅगस्ट रोजीआवक मात्र ४ क्ंिवटल होती. शासनाने हमीदर एकीकडे प्रतिक्ंिवटल ७ हजार ५० रुपये जाहीर केले आहेत. बाजारात मात्र मूग बाजारात येण्याअगोदरच वाढलेले भाव कमी होत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. यावर्षी मुगाचे अपेक्षित उत्पादन होईल की नाही, याबाबत साशंकता आहे. त्यामुळे खासगी बाजारात मुगाचे भाव वाढतील, अशी शेतकºयांना अपेक्षा आहे. तथापि, एकाच दिवसात मुगाचे भाव कमी झाले आहेत.उडिदाचे भावही २८ आॅगस्ट रोजी प्रतिक्ंिवटल सरासरी ४ हजार तर जास्तीचे भाव हे ५ हजार २०० रुपयांवर पोहोचले होते.२९ आॅगस्ट रोजी उडिदाच्या भावात घट होत सरासरी ४,३०० तर जास्तीचे भाव ४,३०० रुपयांवर खाली आले. उडिदाची आवक २८ आॅगस्ट रोजी ४६ क्ंिवटल तर २९ आॅगस्ट रोजीही ४६ क्ंिवटलच होती.
एकाच दिवसात कोसळले मुगाचे भाव!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 2:18 PM