कुरूम : नजीकच्या ग्राम मधापुरी येथे रेशीम उद्योग कार्यक्रमांतर्गत तुती लागवड कार्यक्रम बुधवारी ग्रामपंचायत प्रांगणात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच प्रदीप ठाकरे होते. यावेळी मार्गदर्शक म्हणून प्रादेशिक रेशीम कार्यालय अमरावतीचे सहायक संचालक महेंद्र ढवळे, केंद्रीय रेशीम अनुसंधान केंद्र अमरावतीचे वैज्ञानिक रामविलास कुछवाह, जिल्हा रेशीम केंद्र अकोल्याचे क्षेत्र संचालक सुनील मानकर, प्रादेशिक रेशीम सहायक अमरावती क्षेत्र सहा. टी. एस. शेंडे यांच्यासह दादूभैया श्रीवास, अमर ठाकरे, संतोष शिरभाते, मिलिंद ठाकरे, ग्रामसेवक आर. एच. राठोड यांची उपस्थिती होती.
यावेळी ग्रामपंचायत मधापुरीच्या वतीने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. तर तुती लागवड करणारे शेतकरी रवींद्र मोहिते, सत्यम ठाकरे, संतोष शिरभाते यांचा सहायक संचालक महेंद्र ढवळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
अधिकारी सुनील मानकर, महेंद्र ढवळे, सरपंच प्रदीप ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. ज्यावेळेस तुतीस कोष तयार होत नाही, त्यावेळेस तुतीचा पाला जनावरांना खाऊ घालून सिल्क टू मिल्क कार्यक्रम तयार करून ब्रँड तयार व्हायला पाहिजे, याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी महेंद्र ढवळे, रामविलास कुछवाह, सुनील मानकर, टी.एस,शेंडे यांनी तुती लागवड शेतकरी सत्यम ठाकरे,संतोष शिरभाते,रवींद्र मोहिते यांच्या शेताला भेट देऊन तुती लागवडीची पाहणी केली. यावेळी दादाराव गावंडे, आशिष ठाकरे, सुरेंद्र ठाकरे, संजय सोळंके, देवानंद गेरूळकर, संतोष उभयकर, गजानन खलोरकर, रामनाथ सूर्यवंशी, गणेश गेरूळकर, नरेंद्र ठाकरे, विनोद इंगळे आदी उपस्थित होते.