अकोला : प्रभात किड्स येथे शुक्रवारपासून सुरू झालेल्या सीबीएसई क्लस्टर-९ टेबल टेनिस स्पर्धेत पहिल्या दिवशी मुलींमध्ये नागपूर तर मुलांमध्ये मुंबई-गुजरात संघाने वर्चस्व प्राप्त केले. १४ वर्षाखालील मुलींच्या स्पर्धेत मॉर्डन स्कूल नागपूर, देव पब्लिक स्कूल एैरोली, नारायणा विद्यालय नागपूर, आदित्य बिर्ला पब्लिक स्कूल चंद्रपूर, छत्रपती भव विद्यालय कोल्हापूर, भारतीय विद्या भवन नागपूर, आनंद निकेतन अहमदाबाद व दिल्ली पब्लिक स्कूल सुरत यांनी विजय प्राप्त केला. १४ वर्षाखालील मुलांच्या स्पर्धेत देव पब्लिक स्कूल एैरोली, जी.डी. गोयनका स्कूल सुरत, न्यू हॉरिझोन पब्लिक स्कूल नवी मुंबई, किड्स किंगडम पब्लिक स्कूल खुरेगाव, भवनस पब्लिक स्कूल नागपूर, जिंदाल विद्यालय मंदिर ठाणे, एमराल्ड हाईटस अकोला, स्कूल ऑफ स्कॉलर्स यवतमाळ, बिर्ला स्कूल पुणे, स्कूल ऑफ स्कॉलर्स नागपूर, कोल्हापूर पब्लिक स्कूल कोल्हापूर, आत्मीया विद्या मंदिर सुरत, सिमबॉयसिस नाशिक यांनी यश मिळविले. १९ वर्षाखालील मुलांच्या स्पर्धेत आत्मीया विद्या मंदिर सुरत, भवनस विद्या मंदिर नागपूर, भागीरथी राठी स्कूल सुरत, बिर्ला स्कूल कल्याण, आदित्य बिर्ला पब्लिक स्कूल चंद्रपूर व जिंदाल विद्या मंदिर वाशिंद यांनी यश मिळविले. १६ वर्षाखालील मुलांच्या स्पर्धेत नवरचना स्कूल बडोदा, दिल्ली पब्लिक स्कूल सुरत, सिमबॉयसिस स्कूल नाशिक, एमराल्ड स्कूल अकोला, किड्स किंगडम पब्लिक स्कूल मालेगाव रोड, बी.के. बिर्ला स्कूल पुणे, आप्पासाहेब बिरानले स्कूल सांगली, अंबुजा विद्यालय चंद्रपूर, भारतीय विद्या भवन नागपूर, भवन स्कूल नागपूर, प्रभात किड्स अकोला, सेंटर पॉईंट स्कूल नागपूर, आत्मीया विद्या मंदिर सुरत, कोल्हापूर पब्लिक स्कूल, महादेवभाऊ सावजी स्कूल मलकापूर व इंदिरा नॅशनल स्कूल पुणे यांनी विजय मिळविला.
पहिल्या दिवशी नागपूरसह मुंबई-गुजरातचे वर्चस्व
By admin | Published: October 10, 2014 11:13 PM