अकोला : राज्य परिवहन महामंडळाने मुंबई-नागपूर-मुंबई दरम्यान र्मयादित कालावधीकरीता सुरू केलेल्या शिवनेरी बससेवेच्या प्रवासभाड्यात कपात केली आहे. नाताळानिमित्त सर्वत्र सुट्टय़ा लागलेल्या असाताना, प्रवासात असणार्या किंवा प्रवासाला निघणार्या प्रवाशांना या दरकपातीचा लाभ घेता येणार आहे.महाराष्ट्र विधीमंडळ अधिवशेन दरम्यान नागपूरला जाणार्या प्रवाशांची गर्दी विचारात घेऊन राज्य परिवहन महामंडळाने ६ डिसेंबर ते ५ जानेवारी या र्मयादित कालावधीकरीता शिवनेरी बससेवा सुरू केली. राज्य परिवहन महामंडळाने नुकतीच शिवनेरीच्या प्रवासभाड्यात कपात केली असून, नागपूर-मुंबई या ९00 कि.मी. अंतरासाठी शिवनेरीने प्रवास करणार्या प्रवाश्यास आधी २३७0 रूपये मोजावे लागत होते. कपातीनंतर आता १८00 रूपयेच मोजावे लागणार आहेत. प्रवाशांनी केलेल्या मागणीवरून ५७0 रूपये ही भरघोस कपात करण्यात आली असल्याची माहिती राज्य परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे यांनी महामंडळाच्या संकेतस्थळावर प्रकाशित केली आहे. संकेतस्थळावर आणि मार्गात लागणार्या सर्व प्रमुख बस स्थानकांवरील आरक्षण केंद्रांवर या सेवेचे ऑनलाईन आरक्षण उपलब्ध असल्याचे देखील सांगण्यात आले आहे.सद्या सर्वत्र नाताळाच्या सुट्टय़ा सुरू असल्याने राजधानी आणि उपराजधानी यांना जोडणार्या या सेवेमुळे मुंबई आणि नागपुरसह अमरावती, अकोला, औरंगाबाद, अहमदनगर व मार्गातील इतर प्रमुख शहरातील जनतेला या दरकपातीचा अधिक लाभ मिळणार आहे. ६ ते ५ जानेवारी या र्मयादीत कालावधीसाठी सुरू करण्यात आलेली ही सेवा पुढे सुल राहणार की नाही याबाबत अद्याप कुठलीच घोषणा करण्यात आलेली नाही.
मुंबई-नागपूर शिवनेरी सेवेच्या प्रवासभाड्यात कपात
By admin | Published: December 29, 2014 11:51 PM