शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
2
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
3
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
4
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
5
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
6
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
7
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
8
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
9
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
10
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
11
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
12
हरयाणा, महाराष्ट्रानंतर आता भाजपाचा दिल्लीवर डोळा, केजरीवालांना नमवण्यासाठी आखली अशी रणनीती
13
video: गावात शिरली 20 फुटी मगर; तरुणाने पकडून खांद्यावर घेतले अन् सुखरुप नदीत सोडले...
14
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
15
सोन्याच्या ४० खाणी, इतकं सोनं की विचारूच नका; 'यांच्या' हाती लागला कुबेराचा खजिना
16
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
17
प्रसाद ओकने असं काय विचारलं की मंंजिरीने थेट चिमटाच गरम केला? पती-पत्नीचा धमाल व्हिडीओ व्हायरल
18
Fact Check : नागपुरात EVM सह भाजपाचे कार्यकर्ते पकडल्याचा दावा खोटा; नेमकं प्रकरण काय?
19
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
20
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार

औषध दुकानांची मुंबईतील अधिकाऱ्यांकडून तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 10:54 AM

नियंत्रण मिळविण्यासाठी मुंबई येथील दोन अधिकाºयांनी अकोल्यातील औषध दुकानांची मंगळवारी तपासणी केली.

अकोला : अकोला अन्न व औषध प्रशासन विभागात अधिकाऱ्यांची रिक्त पदे तसेच जिल्ह्यातील औषध व्यावसायिकांचा वाढलेला बेताल कारभार जागेवर आणण्यासाठी शहरातील औषध दुकानांची मुंबईतील दोन अधिकाºयांच्या पथकाने मंगळवारी तपासणी केली. यामधील एक अधिकारी आणखी काही दिवस तपासणी करणार असल्याची माहिती आहे.अन्न व औषध प्रशासन विभागात सध्या सहआयुक्ताचा प्रभार हेमंत मेतकर यांच्याकडे आहे; मात्र त्यांच्या व्यतिरिक्त अधिकारी व कर्मचारी या कार्यालयात नसल्याने औषध दुकानांची तपासणी थांबलेली आहे. अशातच अकोल्यातील औषध दुकानांचा कारभार पुरता ढेपाळला असून, विनादेयकामध्ये विक्री करणे, तसेच बड्या मेडिकल संचालकांचे परवाने नसतानाही दुकान खुलेआम सुरू असणे यासारखे प्रकार प्रचंड वाढले आहेत.त्यामुळे या सर्व प्रकारावर नियंत्रण मिळविण्यासाठी मुंबई येथील दोन अधिकाºयांनी अकोल्यातील औषध दुकानांची मंगळवारी तपासणी केली. ही तपासणी सुरूच राहणार असून, आणखी काही औषध दुकानांचे परवाने तसेच देयक तपासण्यात येणार असल्याची माहिती आहे. अकोला व वाशिम या दोन जिल्ह्यातील औषध दुकानदारांना अधिकारी व कर्मचारी नसणे हे चांगलेच पथ्यावर पडत असल्याची माहिती आहे.

टॅग्स :AkolaअकोलाFDAएफडीए