अकोला : ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाचा समारोप होण्याच्या दुसर्याच दिवशी शहरात घाण व कचर्याचे ढीग साचल्याचे सचित्र वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केल्याची दखल घेऊन महा पालिका आयुक्त अजय लहाने यांनी पुन्हा एकदा संपूर्ण शहरात स्वच्छता अभियान राबवण्याचे निर्देश जारी केले आहेत. प्रभागांमध्ये आरोग्य निरीक्षक व सफाई कर्मचार्यांना सामूहिकरी त्या सकाळी १0.३0 ते दुपारी २ वाजेपर्यंत दररोज स्वच्छता अभियान राबवणे बंधनकारक करण्यात आले आहे. परिसरातील अस्वच्छता, साफसफाईअभावी नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. पावसाळ्यात या समस्येत अधिकच भर पडते. ही बाब ध्यानात घेऊन शासनाने १५ स प्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान राबवण्याचे निर्देश दिले होते. त्यानुषंगाने महापालिका प्रशासनाने चारही झोनमध्ये सार्वजनिक जागा, खुली मैदाने, मन पा शाळांचा परिसर आदी ठिकाणी स्वच्छता अभियान राबवले. अभियानात सर्वपक्षीय राजकीय नेते, महापालिका पदाधिकारी, नगरसेवकांसह प्रशासकीय अधिकार्यांनी मोठय़ा उत्साहात सहभाग घेतला. अभियानाच्या निमित्ताने सर्वसामान्य नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व समजले, यात दुमत नाही. २ ऑक्टोबर रोजी अभियानाचा समारोप झाल्यानंतर काही कामचुकार आरोग्य निरीक्षक व सफाई कर्मचार्यांमुळे शहरात घाण व कचर्याचे ढीग साचून असल्याचे सचित्र वृत्त ‘लोकम त’ने प्रकाशित केले. अर्थातच, ही मोहीम ठरावीक कालावधीच्या अभियानापुरती सीमित नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. त्यामुळे महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी पुन्हा एकदा शहरात प्रभागांमध्ये स्वच्छता अभियान सुरू करण्याचे निर्देश बुधवारी जारी केले आहेत.
आरोग्य निरीक्षकांवर जबाबदारीमनपाच्या स्वच्छता व आरोग्य विभागात कार्यरत सर्व आरोग्य निरीक्षकांना सकाळी १0.३0 ते दुपारी २ वाजेपर्यंत दररोज त्या- त्या प्रभागात स्वच्छता मोहीम राबवण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. संबंधित प्रभागांमध्ये कार्यरत सफाई कर्मचार्यांच्या मदतीने लहान-मोठे नाले, सार्वजनिक जागा, रस्ते आदी ठिकाणी दररोज स्वच्छतेच्या कामांना सुरुवात करावी लागणार आहे. आयुक्तांच्या निर्देशांचे आरोग्य निरीक्षक व सफाई कर्मचारी किती प्रामाणिकपणे पालन करतात, हे लवकरच दिसून येणार आहे.