अकोला: शहरात सिमेंट रस्त्यांच्या कामांची पाहणी करण्यासाठी मंगळवारी महापालिका आयुक्त अजय लहाने पुन्हा एकदा रस्त्यावर उतरले. दुर्गा चौक ते अग्रसेन चौकपर्यंत रस्त्याच्या कामाची पाहणी करीत आयुक्तांनी रस्त्याच्या कामात कोणतीही तडजोड स्वीकारणार नसल्याचे स्पष्ट करीत संबंधित कंत्राटदार व बांधकाम विभागातील अधिकार्यांना सूचना केल्या.अतवृष्टीमुळे दुरवस्था झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठी शासनाकडून २0१३ मध्ये महापालिकेला १५ कोटींचा निधी दिला होता. या निधीतून प्रशासनाने डांबराचे १२ तसेच सिमेंट काँक्रिटच्या आठ रस्त्यांची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला. जुने शहरातील कॅनॉल रोड वगळता इतर डाबरी रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. तर सिमेंट काँक्रिट रस्त्यांची कामे प्रगतिपथावर सुरू आहेत. सिमेंट काँक्रिट रस्त्यांची कामे ह्यआरआरसीह्ण कंपनीला देण्यात आली असून नोव्हेंबर २0१५ मध्ये मुख्य पोस्ट ऑफिस ते सिव्हिल लाइन रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. सुमारे ३८ फूट रुंद रस्त्याचे काम निकषानुसार व्हावे, यासाठी मनपा आयुक्त अजय लहाने यांनी दर दोन दिवसाआड रस्त्याच्या कामाची पाहणी करण्याचा सपाटा लावला होता. रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर आयुक्तांच्या पाहणीचे फलित समोर आले. यादरम्यान, माळीपुरा ते मोहता मिलपर्यंत सिमेंट रस्त्याचे काम पूर्ण झाले असून मागील काही दिवसांपासून दुर्गा चौक ते अग्रसेन चौकपर्यंत रस्त्याचे काम सुरू आहे. आयुक्त लहाने यांनी मंगळवारी अचानक दुर्गा चौक रस्त्याच्या कामाची पाहणी केली. बांधकाम विभागाचे उपअभियंता कृष्णा वाडेकर व राजराजेश्वर क न्स्ट्रक्शन कंपनीच्या अभियंत्यांसोबत चर्चा करून रस्त्याच्या गुणवत्तेबद्दल सूचना केल्या.
महापालिका आयुक्त पुन्हा रस्त्यावर
By admin | Published: July 20, 2016 1:32 AM