शहरं
Join us  
Trending Stories
1
'फेक नॅरेटिव्ह'च्या फॅक्टरीचे शरद पवार मालक, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल
2
पालघरमध्ये ठाकरे गटाला धक्का, भारती कामडी यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
3
२०१९ च्या विधानसभेत मिळालेल्या जागा राखताना महायुतीची होणार दमछाक, उत्तर मध्य आणि पूर्व मुंबईत महायुतीसमोर मविआचे तगडे आव्हान
4
‘मोफत’ घोषणांचा सपाटा; वित्तीय भार पेलणार कसा? राज्यावर आताच आहे साडेसात लाख कोटींचे कर्ज
5
आजचे राशीभविष्य, ७ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक प्रसन्नता जाणवेल
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: शरद पवार फेक नॅरेटिव्ह'च्या फॅक्टरीचे मालक, तर सुप्रिया सुळे...
7
EVM हॅक करून तुम्हाला जिंकून देतो; ५ लाख न दिल्यास पराभव करेन, उद्धवसेनेच्या उमेदवाराकडे मागितली खंडणी
8
हल्ला, फसवणूक, विनयभंग अन् जुगाराचे आरोपी निवडणुकीच्या रिंगणात, चारपैकी एका उमेदवाराविरोधात न्यायालयीन खटला प्रलंबित
9
वरळीत वरचष्मा कोणाचा? आदित्य ठाकरे विरुद्ध देवरा आणि देशपांडेंच्या उमेदवारीमुळे रंगत
10
Ind Vs Aus: "ऑस्ट्रेलिया भारताला ३-१ ने नमवेल", रिकी पाँटिंगने केलं भाकित
11
महिलांना दरमहा ३ हजार रुपये, राहुल गांधी यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची गॅरंटी
12
बुरखा घालून मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेला बेड्या, लोहमार्ग पोलिसांकडून साथीदारालाही अटक
13
पत्नी, वडिलांचा अपमान करणाऱ्याचा काढला काटा, पनवेलमधील घटना, उत्तर प्रदेशातून १ अटकेत
14
मार्गिकांसाठी आता वांद्रे-खार पादचारी पूल तोडणार, पश्चिम रेल्वेवरील हार्बरचे वेळापत्रक ६ महिने विस्कळीत राहणार
15
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
16
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
17
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
19
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
20
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 

महापालिका आयुक्त अजय लहाने यांची बदली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2017 3:06 AM

अकोला: शहराच्या विकास कामांप्रती रोखठोक भूमिका घेणारे आणि प्रशासकीय वतरुळात शिस्तप्रिय अधिकारी अशी ओळख असणार्‍या महापालिकेचे आयुक्त अजय लहाने यांची यवतमाळ येथे उपजिल्हाधिकारी पदस्थापनेवर बदली करण्यात आली आहे. त्यांच्या बदलीचे आदेश महसूल विभागाने ७ ऑगस्ट रोजी जारी केले. मनपाच्या आयुक्तपदासाठी अद्याप कोणत्याही अधिकार्‍याचे नाव निश्‍चित न झाल्यामुळे आयुक्तपदी कोणाची वर्णी लागते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

ठळक मुद्देयवतमाळ येथे उपजिल्हाधिकारी पदावर होणार रुजूशिस्तप्रिय अधिकारी अशी ओळख बदलीचे आदेश महसूल विभागाने ७ ऑगस्ट रोजी जारी केले

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: शहराच्या विकास कामांप्रती रोखठोक भूमिका घेणारे आणि प्रशासकीय वतरुळात शिस्तप्रिय अधिकारी अशी ओळख असणार्‍या महापालिकेचे आयुक्त अजय लहाने यांची यवतमाळ येथे उपजिल्हाधिकारी पदस्थापनेवर बदली करण्यात आली आहे. त्यांच्या बदलीचे आदेश महसूल विभागाने ७ ऑगस्ट रोजी जारी केले. मनपाच्या आयुक्तपदासाठी अद्याप कोणत्याही अधिकार्‍याचे नाव निश्‍चित न झाल्यामुळे आयुक्तपदी कोणाची वर्णी लागते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महापालिकेचे तत्कालीन आयुक्त सोमनाथ शेटे यांची बदली झाल्यानंतर १२ सप्टेंबर २0१५ रोजी अजय लहाने यांनी आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारली होती. स्पष्टवक्ता, विकास कामांप्रती रोखठोक भूमिका घेणार्‍या आयुक्त लहाने यांच्या कार्यकाळात मनपातील महत्त्वाची पदे रिक्त होती. उपायुक्त, लेखाधिकारी, नगररचनाकार, शहर अभियंता, कार्यकारी अभियंता (जलप्रदाय विभाग), सहायक आयुक्तांच्या पदांवर नियुक्त होण्यास कोणीही अधिकारी तयार होत नसल्याचे चित्र होते. प्रशासकीय यंत्रणा मजबूत करण्यासाठी आयुक्त लहाने यांनी रिक्त पदांवर सक्षम अधिकार्‍यांची नियुक्ती व्हावी, यासाठी शासनाकडे सतत पाठपुरावा केला. परिणामस्वरूप उपरोक्त सर्व रिक्त पदांवर शासनाने अधिकार्‍यांच्या नियुक्त्या केल्या. कामचुकार कर्मचार्‍यांना वठणीवर आणत त्यांनी प्रशासकीय कामकाज सुधारण्यासाठी आकृतिबंध, बिंदू नामावली आदींसारख्या क्लिष्ट मुद्यांना हात लावला. थकीत वेतनाची समस्या लक्षात घेऊन जीपीएस प्रणालीद्वारे शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण करून सुधारित कर लागू केला. प्रमुख रस्त्यांचे रुंदीकरण करून त्यामध्ये एलईडी पथदिवे उभारण्याच्या कामाला त्यांनी सुरुवात केली. घरोघरी जाऊन कचरा जमा करण्यासाठी १२५ घंटा गाड्यांची यंत्रणा कार्यान्वित केली. कचर्‍याच्या मुद्यावर खर्च जास्त होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर मनपाच्या स्तरावर १६ ट्रॅक्टरची खरेदी केली. सिटी बस सेवेचा क रारनामा मनपाच्या हिताचा करून बस सेवा सुरू केली. आयुक्त अजय लहाने यांनी उण्यापुर्‍या दोन वर्षांच्या कालावधीत शहर विकासाची गाडी रुळावर आणली होती. असे असताना शासनाने त्यांची अचानक यवतमाळ येथे उपजिल्हाधिकारी पदासाठी बदली केल्याचे आदेश काढल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

रस्त्यांचे ‘वर्किंग एस्टिमेट’ बदललेमनपाला प्राप्त निधीतून सात सिमेंट रस्त्यांची कामे निकाली काढण्यात आली. ही कामे दज्रेदार होण्यासोबतच रस्त्यांचे ‘वर्किंग एस्टिमेट’ बदलण्याचा धाडसी निर्णय आयुक्त अजय लहाने यांनी घेतला. जे रस्ते १८ ते २0 फूट रुंदीचे होणार होते, ते ३५ ते ४0 फूट रुंद केले.

पाणीपुरवठय़ाचा प्रयोग सुरूअकोलेकरांना थेट मुख्य जलवाहिनीद्वारे केला जाणारा पाणीपुरवठा बंद करून तो केवळ जलकुंभातूनच करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला. नळांना मीटर लावण्याची मोहीम सुरू केली. 

लोकप्रतिनिधींच्या राजकारणात बळी!भाजपाच्या स्थानिक लोकप्रतिनिधींच्या अंतर्गत राजकारणामुळे अजय लहाने यांची बदली झाल्याचे बोलल्या जाते. एका प्रामाणिक, शिस्तप्रिय अधिकार्‍याचा हकनाक बळी गेल्याची चर्चा शहरात सुरु आहे.

यवतमाळ येथे उपजिल्हाधिकारी पदस्थापनेवर बदली झाली आहे. या संदर्भात बदलीचे आदेश विभागीय आयुक्तांना प्राप्त झाले आहेत. येत्या दोन दिवसात नगर विकास विभागाकडून कार्यमुक्तीचे आदेश प्राप्त होतील.- अजय लहाने, आयुक्त, मनपा