यावेळी मनपा आयुक्तांनी टेस्टसाठी आलेल्या नागरिकांशी संवाद साधला. तसेच यावेळी सर्व क्षेत्रीय अधिकारी यांना सर्व कोविड चाचणी केंद्रावर तपासणीसाठी आलेल्या नागरिकांना तसेच शहरातील व्यापाऱ्यांना चाचणीसाठी त्रास होऊ नये यासाठी विशेष लक्ष देण्यासाठी आणि सोशल डिस्टन्सिंग, नियमाचे पालन करणे तसेच सर्वांनी चेहऱ्यावर मास्क लावणे तसेच सर्व केंद्रांवर वेळापत्रक लावणे आणि टोकन सिस्टीमचा अवलंब करण्यासाठी सूचना दिल्या. यामुळे नागरिकांना होणारा त्रासही कमी होईल व नागरिकांना जास्त वेळ थांबावेही लागणार नाही. या तपासणी केंद्रांवर साहित्य पुरविण्यासाठी एक विशेष पथकाची नेमणूक करण्यात आली आहे.
अकोला महानगरात कोरोना विषाणूचा वाढत असलेला प्रादुर्भाव लक्षात घेता शहरातील नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग नियमाचे काटेकोरपणे पालन करणे तसेच चेहऱ्यावर मास्क आणि सॅनिटायझरचा वापर तसेच प्रशासनाव्दारे वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करून सहकार्य करण्याचे आवाहन केले तसेच शहरातील ज्या नागरिकांना कोरोनासदृश लक्षणे आहेत त्यांनी कोविडची चाचणी करून घ्यावी असेही मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी सांगितले.