अकोला: भाजपमधील अंतर्गत गटबाजी व दबावतंत्रामुळे महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ बदलीच्या प्रयत्नात आहेत. यासंदर्भातील संकेत त्यांनी दिल्यामुळे की काय, भाजपमधील एका गटाने आयुक्त पदासाठी नवीन अधिकाºयाची शोधमोहीम सुरू केली आहे. वाशिम जिल्हा परिषदेत कार्यरत एका अधिकाºयाच्या नावावर एकमत झाल्याची माहिती आहे.महापालिकेत तत्कालीन आयुक्तांनी मनपाच्या तिजोरीची अक्षरश: लूट केल्याचा इतिहास आहे. अवघ्या चार ते पाच महिन्यांत तब्बल २० टक्क्यांच्या मोबदल्यात सहा-सहा कोटींची देयके अदा करण्याचा विक्रम काही तत्कालीन अधिकाºयांच्या नावावर आहे. कमिशनखोरी व पदाधिकारी-नगरसेवकांच्या दबंगगिरीमुळे राज्यात बदनाम झालेल्या महापालिकेत प्रामाणिक अधिकारी नियुक्त होण्यास धजावत नसल्याचे चित्र होते. अशा कमिशनखोरीला तत्कालीन आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, अजय लहाने व तूर्तास आयुक्त जितेंद्र वाघ यांनी लगाम लावल्याची परिस्थिती आहे. २०१४ मध्ये महापालिकेत सत्तापरिवर्तन होऊन मनपाची सत्तासूत्रे पुन्हा एकदा भाजपच्या ताब्यात आली. यादरम्यान मनपात आयुक्तपदी रुजू झालेल्या अजय लहाने यांनी विकासाची व प्रशासकीय कामकाजाची गाडी रुळावर आणल्याचे समोर आले. अधिकाºयांना हाताशी धरून मनमानी करणारे कंत्राटदार तसेच नगरसेवकांच्या कमाईचे मार्ग बंद झाल्याचा रोष अजय लहाने यांच्यावर व्यक्त करून त्यांची बदली करण्यात आली. जितेंद्र वाघ यांच्या बाबतीत परिस्थिती निराळी असल्याचे दिसून येते. मनपाच्या आयुक्त पदासाठी जितेंद्र वाघ यांच्या नावाची शिफारस भाजपमधील एका गटाने केल्यामुळे वाघ यांच्यावर दुसºया गटाचा रोष आहे. त्याचा परिपाक म्हणून की काय, वाघ यांच्यावर सातत्याने दबावतंत्राचा वापर केला जात असल्याची चर्चा आहे. या सर्व प्रकाराला वैतागलेल्या जितेंद्र वाघ यांनी बदलीसाठी प्रयत्न चालविल्याची माहिती आहे.आता नवीन आयुक्त कोण?भाजपमधील अंतर्गत गटबाजीचा परिणाम महापालिक ा व पर्यायाने शहराच्या विकासावर होत आहे. प्रामाणिक अधिकाºयांना दबावात राहून कामकाज करावे लागत असल्याची राज्यभरात चर्चा आहे. आयुक्त जितेंद्र वाघ यांची बदली झाल्यास भविष्यात मनपाची सूत्रे नेमका कोणता अधिकारी स्वीकारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मनपात मुख्य लेखापरीक्षकच नाहीत!गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सत्तेचा गवगवा करणाऱ्या भाजपच्या कार्यकाळात महापालिकेची अतिशय बिकट परिस्थिती आहे. मनपातील एक उपायुक्त पद रिक्त असून, सहायक आयुक्त डॉ. दीपाली भोसले, सहायक आयुक्त पूनम कळंबे यांच्याकडे क्षेत्रीय अधिकाºयांचे प्रभार सोपविण्यात आले आहेत. रिक्त पदांचा अनुशेष दूर करण्याच्या गप्पा होत असताना मनपाचा आर्थिक कारभार पाहण्याची जबाबदारी असणाºया मुख्य लेखापरीक्षकांचे महत्त्वाचे पद रिक्त असल्याचे दुर्दैवी चित्र आहे, तसेच अनेक महत्त्वाची पदे रिक्त आहेत. अशा स्थितीत प्रशासकीय कामकाजावर पकड असणाºया आयुक्त जितेंद्र वाघ यांच्यासोबत भाजपचे बिनसले असून, याचा परिणाम शहरातील विकास कामांवर होत आहे.