शहरं
Join us  
Trending Stories
1
नवे चेहरे, नेत्यांचे नातेवाईकही... काँग्रेसच्या एकाच दिवशी दोन याद्या; आतापर्यंत ८७ उमेदवार जाहीर
2
भाजपचे ८८ आमदार रिंगणात, दुसऱ्या यादीमध्येही नेत्यांच्या नातेवाईकांचा समावेश, ९ आमदारांना तिकीट
3
थोरात समर्थकांचा ८ तास ठिय्या; वसंत देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा, महिला आयोगाकडून दखल
4
माहीममध्ये अमित ठाकरेंना महायुतीकडून पाठिंबा? भाजप मदतीसाठी धावला; मुख्यमंत्री शिंदेंच्या निर्णयाकडे लक्ष
5
नितेश राणेंविरुद्ध पारकर, राठोडांसमोर जयस्वाल; उद्धवसेनेच्या यादीत अनिल गोटेंसह १८ जण
6
"मी 'त्या' मतदारसंघातून उमेदवारी मागितली नव्हती, तरीही...", सचिन सावंतांची पक्षश्रेष्ठींकडे विनंती! 
7
महासत्ताधीश कोण? कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात होणार चुरस
8
‘मोठा भाऊ’ होण्यासाठी शिंदेसेना-भाजपत शह-काटशह; ठाणे जिल्ह्यातील १८ जागांवर रस्सीखेच
9
पन्नास टक्के झोपडपट्टीवासीयांची मते कुणाला? चारकोपमधून योगेश सागर यांना बुधेलिया यांचे आव्हान
10
‘कोल्ड प्ले’ तिकीट विक्री घोटाळाप्रकरणी छापेमारी, इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त
11
सरकारी निधी गैरवापर रोखा, समिती नेमा! राजकीय जाहिरातींप्रकरणी हायकोर्टाचे आदेश
12
‘नोटा’ला नकार : ७५ हजार मतदारांनी निवडला होता ‘नोटा’ चा पर्याय 
13
Sanjay Singh : "भाजपाने केला केजरीवालांना मारण्याचा प्रयत्न, द्वेषाच्या राजकारणाने..."; आप नेत्याचा गंभीर आरोप
14
'बटेंगे तो कटेंगे': भाजपच्या भूमिकेवर RSS चं पहिल्यांदाच भाष्य; होसबळे म्हणाले...
15
नेत्रदिपक कामगिरी! CA चं शिक्षण घेतल्यानंतर 'तो' शेतीकडे वळला; आता ५५ लाखांचा टर्नओव्हर
16
बंडोबा झाले थंड! उल्हासनगरमध्ये आयलानी व कलानी लढतीकडे सगळ्यांचे लक्ष का?
17
"आम्हाला टोलमाफीचे गाजर नको", सुमीत राघवनचा संताप, शिंदे-फडणवीसांना टॅग करत म्हणाला...
18
नेटकऱ्यांनी रोहित-विराटला दाखवला 'आरसा'; सचिनच्या चाळीशीतील 'त्या' व्हिडिओचाही दिला दाखला
19
मोठी बातमी: भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून पडळकर, खडकवासल्यातून पुन्हा तापकीर!
20
पोटनिवडणुकीत पराभव तरी भाजपने दिली पुन्हा संधी! हेमंत रासनेंनी कसं जुळवलं गणित?

नगरसेवकांच्या प्रस्तावित सभागृहांवर आयुक्तांची फुली!

By admin | Published: October 09, 2015 1:51 AM

अकोला महापालिका क्षेत्रातील ३0 टक्के कामे केली रद्द

अकोला: नागरी दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत मनपाला प्राप्त ११ कोटींच्या निधीतून नगरसेवकांना विकास कामे प्रस्तावित करण्याची सूचना प्रशासनाने केली होती. त्यानुसार सर्वपक्षीय नगरसेवकांनी कामे प्रस्तावित केली. परंतु प्रभागात सामाजिक सभागृह असेल, तर पुन्हा दुसर्‍या सभागृहाला परवानगी नाकारण्याचे धोरण प्रशासनाने स्वीकारले आहे. या बदल्यात इतर विकास कामे सुचविण्याचे निर्देश देत आयुक्तांनी अशा अवाजवी ३0 टक्के विकास कामांवर फुली मारली आहे. शहरातील विकास कामांसाठी महापालिकेला नागरी दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत ३ कोटी ९५ लाख रुपये प्राप्त झाले. यापूर्वी ७ कोटी रुपये मिळाले होते. सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेंतर्गत २ कोटी ५0 लाख रुपये, दलितेत्तर योजनेंतर्गत ३ कोटी २३ लाख तसेच मूलभूत सुविधांसाठी २ कोटी ४0 लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला. २ सप्टेंबरच्या सर्वसाधारण सभेत संबंधित योजनांसाठी प्राप्त निधीच्या कामाला मंजुरी देण्यात आली होती. महापौर उज्ज्वला देशमुख यांनी ठरावावर स्वाक्षरी केल्यानंतर या प्रक्रि येला वेग आला. या सर्व निधीतून शहरामध्ये विकास कामे प्रस्तावित करण्याची सूचना प्रशासनाने सर्वपक्षीय नगरसेवकांना केली होती. त्यानुषंगाने नगरसेवकांनी प्रभागात सिमेंट व डांबरी रस्ते, नाल्या, पथदिव्यांसाठी खांब, पेव्हर ब्लॉक, शौचालये तसेच सभागृह उभारण्याच्या कामाचे प्रस्ताव बांधकाम विभागाकडे सादर केले. प्राप्त प्रस्तावांची छाननी करून त्यामधून अवाजवी कामे बाजूला सारण्याचे आयुक्त अजय लहाने यांचे स्पष्ट निर्देश होते. ज्या प्रभागात सामाजिक सभागृहांची उभारणी झालेली आहे, त्याठिकाणी पुन्हा सभागृहाचे काम नामंजूर करण्याचे प्रशासनाचे धोरण आहे.