शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
2
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
3
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
4
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
5
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
6
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
7
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
8
बाबा झाल्यानंतर रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, "सध्या मी ड्युटीवर आहे..."
9
एकाचा 'हल्लाबोल', मग दुसरा 'पलटवार'! निवडणुकीच्या तोंडावर सलील कुलकर्णींची पोस्ट, म्हणाले- "सध्या प्रचारात..."
10
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
11
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
12
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
13
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
14
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
15
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
16
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
17
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी
18
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
19
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
20
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला

चार शिकवणी वर्गांना महापालिकेने लावले ‘सील’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 12:33 PM

अकोला : सुरत येथील एका शिकवणी वर्गाच्या वरच्या मजल्यावर आग लागल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना प्राण गमवावे लागले होते.

अकोला : सुरत येथील एका शिकवणी वर्गाच्या वरच्या मजल्यावर आग लागल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना प्राण गमवावे लागले होते. या शिकवणी वर्गामध्ये अग्निशमन यंत्रणा नसल्यामुळे विद्यार्थ्यांचा बचावसुद्धा करता आला नाही. याच पृष्ठभूमीवर महापालिकेच्या अग्निशमन दलाने सोमवारी शहरातील शिकवणी वर्गांची पाहणी करून चार शिकवणी वर्गांना अग्निशमन यंत्रणा न बसविल्यामुळे ‘सील’ लावले.सुरत येथील घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, महापालिकेच्या अग्निशमन दलाने शहरातील सर्व खासगी शिकवणी वर्ग चालविणाऱ्या संचालकांना आठवडाभरापूर्वीच नोटीस पाठविल्या होत्या; परंतु नोटीस पाठवून शिकवणी वर्ग संचालकांनी कोणतीही उपाययोजना केली नाही. त्यामुळे सोमवारी महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या पथकाने शहरातील शिकवणी वर्गांची पाहणी केली. पाहणीदरम्यान शहरातील प्रा. अजय कुटे यांचे आकाशवाणी पाठीमागील कुटे अ‍ॅकेडमी, तोष्णीवाल ले-आउटमधील प्रा. प्रशांत देशमुख यांचे सरस्वती कोचिंग क्लासेस, प्रा. अजरांबर गावंडे यांचे युनिक कोचिंग क्लासेस आणि प्रा. मुकुंद पाध्ये यांच्या आकाश एज्युकेशन कोचिंग क्लासेसच्या इमारती, हॉलमध्ये कोणत्याच प्रकारची अग्निशमन यंत्रणा नसल्याचे दिसून आले. विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेता, महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी अग्निशमन दलाचे अधिकारी रमेश ठाकरे व प्रभारी अग्निशमन सुरक्षा अधिकारी प्रकाश फुलउंबरकर यांच्या नेतृत्वात या चारही शिकवणी वर्गांना ‘सील’ लावले. यासंदर्भात प्रा. पाध्ये यांना संपर्क साधला असता, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. तसेच प्रा. गावंडे, प्रा. अजय कुटे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांचे मोबाइल संपर्क क्षेत्राच्या बाहेर होते. त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया कळू शकली नाही. इतरही शिकवणी वर्गांवर लवकरच कारवाई!अनेक शिकवणी वर्ग संचालकांनी विद्यार्थी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना केलेल्या नाहीत. इमारतींमध्ये अग्निशमन यंत्रणासुद्धा बसविलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिकेच्या अग्निशमन दलाने सर्व ६४ शिकवणी वर्गांना नोटीस पाठवून डेडलाइन दिली होती. ही डेडलाइन संपल्यानंतरही एकाही शिकवणी वर्ग संचालकाने अग्निशमन यंत्रणा बसविली नाही. त्यामुळे महापालिका अग्निशमन दलाच्यावतीने ही कारवाई सुरूच राहणार आहे.शिकवणी वर्गामध्ये अग्निशमन यंत्रणा नसल्यामुळे मनपा अग्निशमन विभागाने कारवाई केली. कारवाईला आमचा विरोध नाही. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला आम्ही नेहमीच प्राधान्य दिले आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी लवकरच फायर आॅडिट करून अग्निशमन यंत्रणा उभारू.-प्रा. प्रशांत देशमुख, संचालक.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका