शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के मतदान, अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
3
विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय
4
A R Rahman Divorce: आईवडिलांच्या घटस्फोटावर तीनही मुलांची प्रतिक्रिया; म्हणाले, "याक्षणी..."
5
राज ठाकरेंच्या बनावट सहीचा वापर, मनसेकडून शिवसेनेविरोधात तक्रार; वरळीत काय घडलं?
6
Income Tax Rules: तुमच्या मुलांनी केली कमाई तर, कोण भरणार टॅक्स; काय म्हणतो इन्कम टॅक्सचा नियम?
7
भारताने कारविक्रीमध्ये अमेरिकेला टाकले मागे; नऊ महिन्यांत जगभरात विकल्या ६.५ कोटी चारचाकी
8
आता विमानातही सुसाट इंटरनेट, भारताने पाठवला उपग्रह; मस्क यांच्या रॉकेटमधून पोहोचला अंतराळात
9
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
10
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील वर्षी भारतात येणार?
11
कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार? भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांत झाली चर्चा
12
अक्षय कुमारने विधानसभेसाठी पहिल्यांदाच केलं मतदान! भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर बजावलं कर्तव्य
13
Baramati Vidhan Sabha Election 2024: बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
14
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
15
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
16
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?
17
लेकीनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन करतोय बॉलिवूड डेब्यू, पहिल्या वेबसीरिजची घोषणा
18
बाबा सिद्दीकी हत्या: शिवकुमार गौतमच्या पोलीस कोठडीत वाढ
19
संयुक्त जाहीरनाम्यात भर, उपासमारीविरुद्ध लढण्यासाठी जागतिक कराराचा प्रस्ताव; ‘जी-२०’चे युद्धसमाप्तीसाठी आवाहन

मनपाने टिपणी दिलीच नाही; सत्ताधारी कशाच्या आधारे करणार चर्चा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2020 2:18 PM

सत्ताधारी भाजपाचे पदाधिकारी व नगरसेवक सभागृहात कशाच्या आधारे चर्चा करून कारवाईचा प्रस्ताव मांडतील, याकडे सुज्ञ अकोलेकरांचे लक्ष लागले आहे.

अकोला : महापालिकेच्या मुख्य सभागृहात उद्या मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी भाजपाकडून शहरात फोर-जी सुविधेच्या नावाखाली अनधिकृत केबल टाकणाºया मोबाइल कंपन्यांवर दंडात्मक कारवाईचा प्रस्ताव सादर केला जात आहे; परंतु कंपन्यांवर नियमानुसार कारवाई करण्यासाठी प्रशासनाकडे अद्यापही ‘डीआयटी’(माहिती व तंत्रज्ञान संचालनालय)चा अहवाल अप्राप्त असल्याने या विषयी प्रशासनाकडून कोणतीही टिपणी सभागृहाकडे पाठविली नसल्याची माहिती समोर आली आहे. प्रशासनाची टिपणी नसल्यामुळे सत्ताधारी भाजपाचे पदाधिकारी व नगरसेवक सभागृहात कशाच्या आधारे चर्चा करून कारवाईचा प्रस्ताव मांडतील, याकडे सुज्ञ अकोलेकरांचे लक्ष लागले आहे.मनपाच्या परवानगीला धाब्यावर बसवत विविध मोबाइल कंपन्यांनी शहरातील सर्व प्रमुख रस्ते, प्रभागांमध्ये ठिकठिकाणी खोदकाम करून अनधिकृतपणे भूमिगत तसेच ‘ओव्हरहेड’ फायबर आॅप्टिक केबलचे जाळे टाकल्याचा प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणला. सुरुवातीला कंपन्यांच्या खोदकामाची कामाची प्रत्यक्षात पाहणी केल्यानंतर सदर काम नियमात असल्याचा दावा करणारे भाजपाचे पदाधिकारी व नगरसेवक प्रशासनाच्या तपासणीनंतर तोंडघशी पडले. प्रशासनाने शासनाच्या महाआयटी प्रकल्पांतर्गत २६ किलोमीटर अंतराचे फोर-जी केबल टाकणाºया स्टरलाइट टेक कंपनीने टाकलेल्या केबलची खोदकाम करून तपासणी केली असता, त्यासोबतच रिलायन्स जिओ इन्फोकॉम कंपनीचे अनधिकृत चक्क चार-चार पाइप व केबल आढळून आले होते. हा गंभीर प्रकार पाहता आयुक्त संजय कापडणीस यांनी रिलायन्स कंपनीच्या केबलचा शोध घेण्याचा आदेश दिल्यानंतर आजपर्यंत बांधकाम विभागाने तब्बल ७० किलोमीटर भूमिगत अनधिकृत केबल आढळून आल्याची माहिती आहे. तसेच पथखांब, विद्युत खांब व इमारतींवरून टाकलेल्या ‘ओव्हरहेड केबल’चे मोजमाप अद्यापही सुरूच आहे. एकूणच, मनपाकडे ‘रिस्टोरेशन चार्ज’जमा न करणाºया रिलायन्स कंपनीने प्रशासनाचा सुमारे ४० कोटींपेक्षा अधिक महसूल बुडविल्याचा दावा बांधकाम विभागाकडून केला जात आहे. एकूणच भूमिगत केबल, ओव्हरहेड केबल तसेच विनापरवानगी उभारलेल्या मोबाइल टॉवर प्रकरणी मनपाची कारवाई अर्धवट असतानाच सत्ताधारी भाजपाकडून उद्या सर्वसाधारण सभेत मोबाइल कंपन्यांवर दंडात्मक कारवाईचा प्रस्ताव सादर केला जात असल्याने भाजपाच्या भूमिकेप्रती शहरवासीयांमध्ये उलटसुलट चर्चेला ऊत आला आहे.

केंद्रीय राज्यमंत्र्यांनी घेतली दखलमोबाइल कंपन्यांना फोर-जी सुविधेसाठी फायबर आॅप्टिक केबलचे जाळे टाकण्याची परवानगी शासनाच्या ‘डीआयटी’कडून दिली जाते. ‘डीआयटी’ने २०१४ पासून कोणत्या कंपन्यांना परवानगी दिली, याबद्दल मनपाने पत्र दिले असता, या विभागाकडून माहिती देण्यास जाणीवपूर्वक विलंब केला जात आहे. या प्रकाराची केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी दखल घेत दिल्लीस्थित ‘डीआयटी’च्या अधिकाऱ्यांना मनपाला माहिती देण्याचे निर्देश दिले आहेत.सत्ताधाऱ्यांची लगबग कोणासाठी?फोर-जी प्रकरणी सभागृहात प्रस्ताव सादर करणाºया सत्ताधारी भाजपाला प्रशासनाने यावेळी पहिल्यांदा प्रतिसाद दिला नसल्याचे चित्र आहे. मोबाइल कंपन्यांवर दंडात्मक कारवाईसह संचालक मंडळावर फौजदारी दाखल करण्यासाठी प्रशासनावर नैतिक दबाव वाढत असल्याचे पाहून सत्तापक्षाने सोमवारी सायंकाळी तातडीच्या आढावा बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला आयुक्तांसह इतर अधिकारी उपस्थित होते. 

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका