अकाेला: मालमत्ता कर वाढीचा तिढा निमार्ण झाल्याचा परिणाम मनपा प्रशासनाच्या आथिर्क उत्पन्नावर झाला आहे. त्यामुळे दिवाळीच्या दिवसांत मनपा कमर्चाऱ्यांवर उपासमारीची वेळ ओढवली आहे. त्यामुळे काेणत्याही परिस्थितीत मालमत्ता कराची थकबाकी वसूल करणयासाठी प्रशासनाने ४८ पथकांचे गठन केले आहे. एका पथकात तीन याप्रमाणे १४४ मनपा कमर्चाऱ्यांची नियुक्ती करणयात आली असून त्यांच्यासह कर वसूली निरीक्षकांचाही समावेश आहे.
महापालिकेच्या सवर्साधारण सभेत प्रशासनाने सुधारित करवाढीचा प्रस्ताव सादर केला असता सत्ताधारी भाजपने या प्रस्तावाला एकमुखाने मंजूरी दिली हाेती. शहरातील मालमत्तांचे दर तीन वषार्ंनी मुल्यांकन करणे अपेक्षित असताना प्रशासनाने १९९८ पासून मुल्यांकन केलेच नाही. त्याचा परिणाम कर वसूलीवर हाेऊन अत्यल्प उत्पन्नामुळे कमर्चाऱ्यांच्या थकीत वेतनाची समस्या निमार्ण झाली. यासंदभार्त मनपाचे तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी २०१७ मधये मालमत्तांचे मुल्यांकन करीत सुधारित करवाढीचा निणर्य घेतला. तसा प्रस्ताव सवर्साधारण सभेत सादर केला असता सत्ताधारी भाजपने या प्रस्तावाला एकमताने मंजूरी दिली. परंतु सत्ताधारी भाजप व प्रशासनाने अवाजवी करवाढ लादल्याचा आराेप करीत विराेधी पक्ष शिवसेना, काॅंग्रेस व वंचित बहुजन आघाडीने करवाढ कमी करणयाचा बिगुल वाजवला. सदर प्रकरणी नागपूर खंडपीठाने मनपाची करवाढ फेटाळून लावत मालमत्तांचे नव्याने मुल्यांकन करीत सुधारित करवाढ लागू करणयासाठी ऑक्टाेबर २०२० पयर्ंत मुदत दिली हाेती. यादरम्यान, प्रशासनाने नागपूर खंडपीठाच्या आदेशाला सवाेर्च्च न्यायालयात आव्हान दिले. अशास्थितीत दिवाळीच्या ताेंडावर थकीत वेतनाची समस्या निमार्ण झाली असता, प्रशासनाने थकबाकी वसूलीसाठी विविध विभागातील १४४ कमर्चाऱ्यांची नियुक्ती करणयाचा आदेश जारी केला आहे.
१४१ काेटी ४८ लक्ष वसूलीचे आव्हान
सदर प्रकरण न्यायप्रविषट असल्याचा परिणाम कर वसूलीवर झाला असून अकाेलेकरांनी कर जमा करणयाकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे गतवषीर्चा थकीत कर व चालू आथिर्क वषार्तील कर असे एकूण १४१ काेटी ४८ लक्ष रुपये वसूल करणयाचे माेठे आव्हान प्रशासनासमाेर ठाकले आहे.
मनपा कमर्चाऱ्यांच्या थकित वेतनाची निमार्ण झालेली समस्या लक्षात घेता अकाेलेकरांनी थकबाकीची रक्कम जमा करावी,ही अपेक्षा आहे. उत्पन्न नसेल तर मुलभूत सुविधांची पूतर्ता कशी करावी,असा प्रशन उपस्थित हाेणयाची दाट शक्यता आहे.
-संजय कापडणीस आयुक्त मनपा