महापालिकेत १८ फेब्रुवारी रोजी सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले आहे. काेराेना बाधीत रूग्णांची संख्या पाहता जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी १५ फेब्रुवारी राेजी जमावबंदीचा आदेश लागू केला. पाच पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास मनाइ करण्यात आली आहे. अशास्थितीत मनपाच्या सभेला परवानगी नाकारत अपर जिल्हाधिकाऱ्यांनी माेबाइलद्वारे ऑनलाइन सभा घेण्याचे निर्देश पत्राद्वारे जारी केले आहेत. सभेतील विषय सूची मध्ये तब्बल १९ विषयांचा समावेश करण्यात आल्याने ऑनलाइन सभेत यावर सविस्तर चर्चा हाेणे शक्य नसल्याचा मुद्दा शिवसेना व राष्ट्रवादीने उपस्थित केला आहे.
घनकचऱ्याचा प्रकल्प वादाच्या भाेवऱ्यात
शहरालगत भोड येथील इ क्लास जागेवर घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारल्या जाइल. या प्रकल्पासाठी वर्कऑर्डर जारी केल्यानंतर या जागेत भलामाेठा खड्डा असल्याची बाब प्रशासनाच्या निदर्शनास आली. मार्स नामक एजन्सीने तयार केलेल्या ‘डीपीआर’मध्ये व प्रशासनाच्या निविदेत खड्डयाचा समावेश न केल्यामुळे तांत्रिक बाब उपस्थित झाली आहे. विषयावर तांत्रिक घाेळ ध्यानात घेता मनपा आयुक्त निमा अराेरा काेणती भूमिका घेतात याकडे सुज्ञ अकोलेकरांचे लक्ष लागले आहे. या विषयातील तांत्रिक घाेळ ध्यानात घेता मनपा आयुक्त निमा अराेरा यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.
प्रशासनाची धावपळ
मुख्य सभागृहातील सभेला परवानगी नाकारल्यामुळे ऑनलाइन सभेच्या आयाेजनासाठी बुधवारी दुपारनंतर प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाल्याचे दिसून आले. झुम मिटींगद्वारे सभा घेण्याचा पूर्वानुभव नसल्याने व दिर्घकाळ चालणाऱ्या सभेला प्रशासन कशारितीने हाताळते,हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
काॅंग्रेसमध्ये मतांतरे
सर्वसाधारण सभा ऑनलाइल घेण्याच्या मुद्यावरून विराेधी पक्षातील नगरसेवकांमध्ये आपसांत एकमत नसल्याची माहिती आहे. भाेड येथील खड्डा व जनता भाजी बाजारच्या विषयावरून काही नगरसेवकांनी हात ओले केल्याची कुजबुज काॅंग्रेसमध्ये सुरू आहे.