- विजय शिंदेअकोट: आगामी नगर परिषद, महापालिका सार्वत्रिक निवडणूक प्रहार जनशक्ती पक्ष लोकांना सोबत घेऊन लढु असे सुतोवाच प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक तथा अकोला जिल्हा पालकमंत्री बच्चुभाऊ कडु यांनी लोकमतशी बोलताना केले.नगर परिषद, महापालिका निवडणुकि काही महिन्यांवर येउन ठेपलेल्या आहेत. त्यामुळे राजकीय पक्षात हलचल सुरु झाली असुन इच्छुकांची उत्कंठा शिगेला पोहोचत आहे.कोणत्या पक्षाची उमेदवार द्यावी, वार्डात तयारी करण्यापासून तर युती व आघाडी झाली तर आपला वार्ड कोणा पक्षाचे कोट्यात जाईल अशी बेचैन अवस्था कार्यकर्ते आहे.राज्य निवडणूक आयोगाने बहुसदस्यीय प्रभाग रचनेला पूर्णविराम देत बुधवारी एक प्रभाग एक सदस्य (वार्ड)रचना करीत कच्चा प्रारुपआराखडा तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. राजकीय पक्षाची रणनीती ठरविली जात आहे. सध्या राज्यात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची महाआघाडीची सत्ता आहे. या महाआघाडीत प्रहार जनशक्ती पक्ष सहभागी आहे. प्रहारचे संस्थापक तथा आमदार बच्चु कडु हे सरकारमध्ये राज्यमंत्री आहेत. त्या अनुषंगाने नगर परिषद निवडणुकीत प्रहार जनशक्ती पक्षाची भुमिका कशी राहील याबाबत अकोट येथे पालकमंत्री बच्चु कडु यांना विचारणा केली असता,त्यांनी प्रहार जनशक्ती पक्ष नगर परिषद निवडणूक लोकांना सोबत घेऊन लढु असे सुतोवाच केले. सध्या नगर परिषद व महापालिका निवडणूक ह्या महाआघाडी सोबत एकत्र लढायचे की स्वतंत्रपणे याबाबत विचारमंथन पक्षीय बलाबलची गोळाबेरीज सुरु आहे. विशेष म्हणजे बहुसदस्यीय प्रभाग रचना अस्तित्वात असताना कार्यकर्ते सांभाळत उमेदवार वाटप करुन प्रभागाची व्याप्ती व क्राँस व्होटीगची भिती तसेच एका प्रभागात चार सदस्य निवडायचे असल्याने विजयाची शाश्वती वाटत नव्हती. पंरतु आगामी निवडणुकीत एक वार्ड-एक सदस्य रचना होत असल्याने कार्यकर्ते उत्साह संचारला आहे. दरम्यान राज्यमंत्री बच्चु कडु यांनी नगर परिषद निवडणूक लोकांना सोबत घेऊन लढणार असल्याचे गुगली टाकल्याने भविष्यात प्रहार जनशक्ती पक्षाची रणनिती पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.यावेळी त्याचे सोबत प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे, जि.प सदस्य गजानन पुंडकर,प्रहारचे पदाधिकारी सुशिल पुंडकर,निखिल गावंडे,कुलदिप वसु, प्रहार सरपंच राम मंगळे,विशाल भगत यांच्या प्रहार सेवक उपस्थित होते.
नगरपरिषद निवडणुका लोकांना सोबत घेऊन लढणार -बच्चू कडू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 4:34 PM