कोरोना विषय आता जनतेला काही नवीन राहिला नाही. पहिली व दुसरी लाट बघता, कोरोनाबाबतीत अनेकांना कडूगोड अनुभव आले. मात्र गेली महिन्याभरापासून शहरात व तालुक्यातील वातावरण पाहता, जनतेने तोंडाला मास्क बांधणे किंवा कोरोनाच्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी न करता मनमानी केली. पोलिसांनीही फारशी बळजबरी केली केली नाही. परंतु २८ जुलै रोजी दुपारी अचानक पोलिसांनी शहरात वाहनाद्वारे गस्त घालून नागरिकांना कोरोना मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे. अशा सूचना दिल्या व दुपारी ४ वाजता संपूर्ण शहर पोलिसांनी बंद करीत मार्केट बंद केली. त्यामुळे नागरिकांमध्ये चर्चा सुरू झाली. कोरोनाचे संक्रमण वाढले तरी नाही. अनेकांनी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या शहरात वाढली असल्याचा धसका घेतला तर काहींनी नगर परिषदेला कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाली का? अशी विचारणा केली. परंतु नगर परिषदेच्या प्रशासन अधिकारी मयुरी जोशी यांनी गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाचे रिपोर्टिंग येत नसल्याचे सांगितले. मात्र आरोग्य विभागाकडून शहरात २८ जुलै रोजी एक रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली. एक रुग्ण शहरात व एक ग्रामीण भागात पॉझिटिव्ह असून, आज रोजी दोन रुग्ण पॉझिटिव्ह असल्याची माहिती तहसीलदार डॉ संतोष येवलीकर यांनी दिली.
नगर परिषदेला माहिती देणे गरजेचे
नगर परिषद प्रशासनाकडे शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये. याकरिता शासनाच्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करणे व कोरोनाबाधित रुग्ण व त्यांच्या कुटुंबाला सूचित करून कोरोना प्रादुर्भाव रोखणे. याची जबाबदारी आहे. तसेच कोरोना नियमांचे उल्लंघन झाले असल्यास दंड करणे ही जबाबदारी आहे. नगर परिषद प्रशासनाला सुद्धा कोरोनाच्या सद्यस्थितीबाबत माहीती असायलाच हवी. परंतु नगर परिषदेला आरोग्य विभागाकडून माहिती देण्यात येत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
सोशल मीडियावरील ग्रुपवर कोरोनासंबंधी दैनंदिन सर्व माहिती दिली जाते. या ग्रुपमध्ये सर्व संबंधित अधिकारी आहेत. त्यामुळे कोरोना रुग्णांची माहितीच नाही. असे कोणी म्हणून शकत नाही. सर्वांना माहिती दिली जाते. परंतु ती माहिती कोणी पाहतच नाही.
-डॉ. अशोक तापडिया, अधीक्षक ग्रामीण रुग्णालय, तेल्हारा