तेल्हारा : आगामी तेल्हारा नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेल्हारा विकास मंचची नुकतीच बैठक झाली असून, यावेळी नगरपालिकेची निवडणूक विकास मंच लढविणार असल्याची माहिती विकास मंचचे अध्यक्ष राम फाटकर यांनी दिली.
चार वर्षांपूर्वी तेल्हारा नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक झाली होती. त्यावेळीही विकास मंचची स्थापना करून निवडणूक लढविली जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते; परंतु वेळेवर नियोजन होऊ शकले नसल्याने मंच निवडणूक लढवू शकला नाही. परंतु, यावेळी नियोजनबद्ध कार्यक्रम आखून विकास मंच निवडणूक लढविणार असल्याचे विकास मंचचे अध्यक्ष राम फाटकर यांनी सांगितले. या बैठकीत सामाजिक कार्यकर्ते मोहन श्रीवास यांची संभाव्य प्रभागामधून उमेदवारी जाहीर करण्यात आली. या बैठकीला विकास मंचचे अध्यक्ष राम फाटकर, राहुल देशमुख, बजरंग गव्हाणे, प्रमोद सोनटक्के, सुनील उबाळे, विठ्ठल ठाकरे, राजेश देशमुख, अर्जुन खारोडे, सुनील गर्जे, स्वप्नील सुरे, उमेश उज्जैनकर, बाबू टेलर, मंगेश उबाळे, लखन सोनटक्के, निखील देशमुख, गोपाल श्रीवास, बंटी गायकवाड, अंकुश खळसान, विक्रम खारोडे, गिरधारी श्रीवास, योगेश मस्तूद, गणेश भटकर, अजय खोले, गणेश भुजबले, राज खारोडे, सुरेश तायडे आदी उपस्थित होते.